crime (फोटो सौजन्य: social media)
नागपूर शहरातील धंतोली पोलिसांनी एका आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या साहेबाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आशिष रेडिमलला आहे. तो एम.टेक आहे आणि त्याने पुणे आणि नागपूरमधील आयटी कंपन्यांमध्ये कामही केलेलं आहे. पगारही त्याला चांगला होता. परंतु एक वाईट व्यसन त्याला भारी पडलं आहे. त्याचा वाईट संगतीमुळे त्याला जुगाराचे व्यसन लागले आहे. या व्यसनाने त्याचे आर्थिक नुकसान तर झालेच तर एक अट्टल गुन्हेगार देखील बनला आहे. नेमकं काय घडलं या आशिष सोबत? जाणून घेऊया
गोंदिया हादरला! जादूटोणाच्या संशयावरून 60 वर्षीय वृद्धाची हत्या, आरोपीला अटक
धनातोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष रेडिमल्लाला जुगार खेळण्याचा नाद होता. जुगारात त्याने २३ लाख रुपये गमावले होते. त्यामुळे त्याच्यावर कर्जही झाले होते. या कर्जातून बाहेर पाडण्यासाठी ततो चोरी करू लागला. तो नौकरी करत असतांना नागपूरच्या छत्रपतीनगर भागात राहायचा. त्यामुळे त्याला या भागातील घरांची माहिती होती. त्याने निर्जन बंगल्यात चोरी करण्यास सुरवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार आशिष चोरी करण्यासाठी चंद्रपूरवरुन नागपूरला बसने यायचा. घरांची रेकी करायचा आणि नंतर चोरी करायचा. त्यामुळे चोरीच्या बऱ्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या. पोलिस आरोपीचा शोध घेत होते. आशिष रेडिमल्लाने धंतोली परिसरातील शीतल चिंतलवारच्या घरात चोरी केली होती. प्रकरणाचा तपास करत असतांना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचे एक स्केच तयार केले आणि त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे आशिष रेडिमल्लाला अटक केली. यानंतर त्याची चौकशी केली असता त्याने नागपूरच्या इतर भागातही चोरी केल्याची कबूली दिली आहे. आतापर्यंत त्याने पाच घरामध्ये चोरी केल्याचे समोर आले आहे. आता आरोपीला अटक केल्यानंतर धंतोली पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
नागपूरात दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरीच्या दोन घटना; सीसीटीव्हीत कैद
नागपुरात अवघ्या काही तासात दोन ज्येष्ठ महिलांसोबत सोनसाखळी चोरल्याच्या घटना घडल्या आहेत आणि या चोरी एकाच टोळीने केल्याचं समोर आलं आहे.या चोरीचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. भर रस्त्यात ही घटना घडल्यामुळे नागपुरातील रस्त्यांवर चोर बिनधास्त फिरत आहेत कि काय? असा प्रश्न समोर आला आहे. या दोन घटनेने नागपुरात खळबळ उडाली आहे. आरोपींचा अद्याप कुठलाही सुगावा लागेलेला नाही आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीना शोधून काढणं हे आता पोलिसांपुढे आव्हान आहे.
लातूर हादरलं! ५० रुपयाची उधारी बेतली जीवावर; धारधार शस्त्राने वार….