Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाचा बाजारच मांडला; गरजू तरुणांवर दलालांचा डोळा, फसवणूक केली लाखोंची…

गेल्या काही वर्षात मुलींचा जन्मदर घटला आहे. त्यामुळे लग्नासाठी मुली मिळणे कठीण होत चालले आहे. त्यातच मुली उच्च शिक्षित झाल्या असून, त्या लग्नासाठी आपल्या 'बरोबरी'चाच मुलगा पसंत करत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 01, 2026 | 11:44 AM
लग्न झाला धंदा; ३ तरुणांची फसवणूक

लग्न झाला धंदा; ३ तरुणांची फसवणूक

Follow Us
Follow Us:

यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून लग्न जुळत नसलेल्या तरुणांना फसविण्याचे प्रकार वाढला आहे. लग्नाकडे एखाद्या धंद्यासारखे पाहणारी टोळी सक्रिय झाली असून, गरजू तरुणांना हेरून त्यांना फसविले जात आहे. केवळ फेब्रुवारी या एकाच महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात अशा तीन घटना पुढे आल्या. प्रत्यक्षात पोलिस रेकॉर्डवर न आलेल्या अशा अनेक घटना ‘बदनामी’च्या भीतीपायी दबून असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या काही वर्षात मुलींचा जन्मदर घटला आहे. त्यामुळे लग्नासाठी मुली मिळणे कठीण होत चालले आहे. त्यातच मुली उच्च शिक्षित झाल्या असून, त्या लग्नासाठी आपल्या ‘बरोबरी’चाच मुलगा पसंत करत आहेत. त्यातून शेतकरी, शेतमजूर मुलांची मोठी अडचण झाली आहे. नेमकी हीच बाब हेरून काही टोळ्या जिल्ह्यात लग्नाचा बाजार मांडण्यासाठी तयार झाल्या आहेत. अशा दोन टोळ्यांनी तीन तरुणांना फसविल्याच्या घटना फेब्रुवारीत पुढे आल्या. घाटंजी तालुक्यातील चोरांबा गावातील टोळीने आधी जळगाव जिल्ह्यातील आणि नंतर नाशिक जिल्ह्यातील अशा दोन गरजू तरूणांना ठगविले.

आधी मुलगी दाखवायची. नंतर लग्नाचा खर्च मुलांनाच मागायचा व सरतेशेवटी गायब व्हायचे, अशी पद्धत या टोळीने वापरली. यात दोन्ही तरूणांना दोन ते अडीच लाखांचा गंडा घालण्यात आला. मात्र, या टोळीवर घाटंजी पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत. तर दुसरीकडे पुसद येथील तरुणालाही दुसऱ्या एका टोळीने गंडा घातला. त्याला परभणी जिल्ह्यातील मुलगी दाखवून २ लाख ४० हजारांनी फसविण्यात आले. त्यात परभणी जिल्ह्यातील तीन महिला व महागाव तालुक्यातील एका पुरूषावर गुन्हाही दाखल करण्यात आला.

छुपे दलालांचा शोध घेण्याची गरज

अशा वाढत्या घटनांमुळे गरजू तरूणांच्या लग्नाचा बाजार मांडला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे छुपे दलाल शोधून त्यांच्या मुस्क्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे. तरी विवाह इच्छुकांनी याकडे गांभीर्याने पाहून विचार करण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.

ज्यादा परताव्याच्या आमिषाने फसवणूक

दुसरीकडे, सातत्याने सायबर चोरटे वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत कोट्यवधींना गंडा घालत असून, शेअर्स व आयपीओमध्ये सवलतीच्या दरात गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठाची १ कोटी ४९ लाख ३३ हजार १५२ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. याप्रकरणी पुणे शहर सायबर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खराडी येथे राहणाऱ्या ७५ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

हे सुद्धा वाचा : निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Web Title: Youth are being cheated with the promise of marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • yavatmal news

संबंधित बातम्या

Yavatmal News: अवैध प्रवासी वाहनांचा बसस्थानकाला विळखा! परिवहन महामंडळ, पोलिस विभाग करणार संयुक्त कारवाई
1

Yavatmal News: अवैध प्रवासी वाहनांचा बसस्थानकाला विळखा! परिवहन महामंडळ, पोलिस विभाग करणार संयुक्त कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.