
Chhatrapati Sambhaji Nagar : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारण्याचा तरुणाचा प्रयत्न; 40 मिनिटांचा थरकाप
पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पठारे प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि न्याय प्रक्रियेला गती मिळावी, यासाठी काही तरुणांनी उपोषण सुरू केले होते. मात्र, या उपोषणाची प्रशासकीय पातळीवर साधी दखलही घेतली गेली नाही. या अन्यायाविरुद्ध आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या योगेश वाघमारे याने टोकाचे पाऊल उचलत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी तातडीने मध्यस्थी करत आंदोलकांशी संवाद साधला. त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, मागण्यांसंदर्भात प्रशासनाच्या वतीने एक लेखी पत्र दिले. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांचे समाधान झाले आणि तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न थांबवला. लेखी पत्र मिळाल्यानंतर हे आंदोलन अधिकृतरीत्या मागे घेण्यात आले असून, ४० मिनिटांच्या या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या गोंधळानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज पूर्वपदावर आले.
Q1. छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाने काय करण्याचा प्रयत्न केला?
योगेश वाघमारे या तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला.
Q2. तरुणाने हे टोकाचे पाऊल का उचलले?
रोहित पठारे प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, या मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली नसल्याने संतापातून त्याने हा प्रयत्न केल्याची माहिती आहे.
Q3. घटनेनंतर किती वेळ तणावाचे वातावरण होते?
या घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तब्बल ४० मिनिटे तणाव आणि गोंधळाचे वातावरण होते.