
Special Health Care and Follow-up for Premature and Low Birth Weight ( अकाली जन्मलेल्या आणि कमी जन्मवजन असलेल्या बालकांसाठी विशेष आरोग्य सेवा आणि पाठपुरावा ) फोटो सौजन्य AI
यावर्षी ‘लहान बाळे, मोठी क्षमता त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पाठपुरावा सेवेत गुंतवणूक करा’ ही संकल्पना आहे. नवजात बालकांच्या आयुष्यातील पहिले काही दिवस आणि महिने अत्यंत महत्त्वाचे असतात, या काळात योग्य पोषण, वेळेवर उपचार, नियमित आरोग्य तपासणी आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यास बालकांचे आरोग्य व भवितव्य सुरक्षित ठेवण्यास मदत होते. विशेषतः अकाली जन्मलेली, कमी वजनाची तसेच आजारी नवजात बालकांसाठी नियमित वैद्यकीय देखरेख आवश्यक आहे.
या सप्ताहादरम्यान जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये नवजात बालकांच्या आरोग्यविषयक विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या नवजात चालकांची अद्ययावत यादी तयार करून त्यांचा नियमित पाठपुरावा करण्यात येत आहे. विशेषतः अकाली जन्मलेली, कमी वजनाची व उच्च जोखमीची बालके यांच्याकडे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे.
जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नवजात बालकांच्या सुरक्षित संगोपनाबाबत जनजागृती व समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच नवजात बालकांना जन्मानंतर तासाभरात स्तनपान सुरू करणे, पहिले सहा महिने केवळ स्तनपान देणे, कमी वजनाच्या बालकांसाठी कांगारू मदर केअर, योग्य पोषण, नियमित लसीकरण, स्वच्छता आणि बालकांच्या वाढीचे निरीक्षण याबाबत मातांचे व कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात येत आहे. पालकांनी नवजात चालकांच्या आरोग्य तपासणीसह नियमित पाठपुराव्याकडे विशेष लक्ष द्यावे. अकाली जन्मलेली व कमी वजनाची बालके यांची नियमित तपासणी करून आरोग्य विभागाच्या उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
अकोल्यात दहा महिन्यांत 71 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; खरीप हंगामातील 62 जणांनी संपवली जीवनयात्रा
– आशा स्वयंसेविका, एएनएम आणि समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून उच्च * जोखमीच्या नवजात बालकांना गृहभेटी देऊन त्यांच्या आरोग्याचा आढावा घेण्यात येत – आहे. या भेटीदरम्यान बालकाचे वजन, स्तनपान, लसीकरण, वाढ व विकासाचे टप्पे, धोक्याची लक्षणे आणि आवश्यक वैद्यकीय तपासण्यांची माहिती घेतली जात आहे. तसेच आवश्यकतेनुसार बालकांना उच्चस्तरीय आरोग्य संस्थांमध्ये संदर्भित करणे, अकाली जन्मलेल्या बालकांची दृष्टीपटल तपासणी, श्रवण तपासणी आणि विकासात्मक मूल्यांकन यावर विशेष भर देण्यात येत आहे.
नवजात बालक दूध पीत नसल्यास, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास, शरीर थंड पडल्यास, ताप आल्यास, हालचाली कमी झाल्यास किंवा आकडी आल्यास तातडीने जवळच्या आरोग्य संस्थेत घेऊन जावे. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेत उपचार – घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.