
डॉक्टरचा तरुणीवर बलात्कार
पुणे : विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला दोन वर्षे सक्तमजुरी आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली; तर विवाहितेला मारहाण केल्याप्रकरणी आरोपीच्या भावाला एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरोपीने केलेले कृत्य गंभीर आणि निंदनीय असून, समाजात योग्य संदेश जाण्यासाठी कठोर शिक्षा ठोठावणे आवश्यक आहे, असे नमूद करत जुन्नर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनंत बाजड यांनी हा निकाल दिला.
या घटनेपूर्वी, पीडितेचे कुटुंब आणि आरोपींमध्ये किरकोळ कारणांवरून भांडणे झाली. त्या रागातून आरोपीने पीडितेच्या घरात बेकायदा घुसून तिला शिवीगाळ केली. पीडितेने त्याला घरात कोणी नसल्याचे सांगून बाहेर काढून दरवाजा बंद केला. मात्र, आरोपीने दरवाजा ढकलून पीडितेचा विनयभंग केला; तर आरोपीच्या भावाने तिला मारहाण केली. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरोधात जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेदेखील वाचा : Pune Accident : संक्रांतीच्या खरेदीला निघालेल्या दोन सख्ख्या बहिणींवर काळाचा घाला; काळेवाडीत ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू
सहाय्यक उपनिरीक्षक एम. पी. गायकवाड यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकारी वकील मयूर घोडके यांनी बाजू मांडली. त्यांनी सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित महिला, तिची सासू, सासरा, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
जमिनीचा वादातून खोटी तक्रार
जमिनीच्या वादातून ही खोटी तक्रार दाखल करण्यात आली असून, कोणत्याही स्वतंत्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने साक्ष नोंदविली नाही, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला. विनयभंग किंवा लैंगिक छळासारख्या सामान्यतः गोपनीय गुन्ह्यात बहुतांश वेळा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतात. अशा प्रकारचा गुन्हा लोकांसमोर कोणी करेल अशी अपेक्षा नसते. आरोपीचा गुन्हाही याच प्रकारचा आहे. पीडितेची आणि प्रत्यक्षदर्शींची साक्ष तक्रार आणि जबाबांशी सुसंगत असून, किरकोळ विसंगतींमुळे पीडितेची साक्ष नाकारता येत नाही, असे निरीक्षण नोंदवित न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले. ही घटना १६ डिसेंबर २०१५ रोजी जुन्नर तालुक्यातील महाळुंगे येथील निमगावा सावा येथे घडली.
हेदेखील वाचा : Mumbai Crime: मैत्रिणीच्या पित्यानेच 13 वर्षीय मुलीचा केला विनयभंग, वाढदिवसासाठी मैत्रिणीकडे गेली होती आणि…