
'लग्न नाही केलंस तर मारून टाकीन'
छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावरुन अल्पवयीन मुलीचे फोटो कॉपी केल्यानंतर ते एडीट करुन बदनामी करण्यात आली. त्यानंतर मुलीचा हात पकडून ‘तू माझ्याशी लग्न न केल्यास, तुला कोणाची होऊ देणार नाही. माझ्यासोबत लग्न नाही केलस तर मारुन टाकीन’ अशी धमकी देण्यात आली. अरबाज (रा. चेलीपुरा) असे तरुणीचा विनयभंग करुन धमकी देणाऱ्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी यांचे इन्स्टाग्रामवर खाते असून, त्यावर त्यांनी मुलीचे फोटो टाकले होते. आरोपी अरबाज याने ते फोटो कॉपी करून त्यात छेडछाड करत १२ जानेवारी रोजी व्हॉट्सअॅप व इन्स्टाग्रामवर व्हायरल केले. या प्रकारामुळे फिर्यादीच्या मुलीची नातेवाईक व ओळखीच्या व्यक्तींमध्ये बदनामी झाली. या घटनेनंतर १४ जानेवारी रोजी सायंकाळी फिर्यादी व त्यांच्या भावांनी आरोपी अरबाज याला समजावून सांगितले. त्यावेळी आरोपीने सोशल मीडियावरील फोटो व व्हिडिओ हटवले होते.
दरम्यान, २७ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास फिर्यादीची मुलगी घराजवळील किराणा दुकानात सामान आणण्यासाठी गेली असता आरोपीने तिचा हात धरून तिला जवळ ओढले. ‘तू माझीच आहेस, माझ्याशी लग्न केलं नाही तर तुला कुणाचीही होऊ देणार नाही’, असे म्हणत तिचा विनयभंग केला. तसेच माझ्याशी लग्न नाही केलंस तर तुला जिवे मारून टाकीन, अशी धमकी देऊन तो पसार झाला. सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता सिन्नर शहरात दुसरीत शिकणाऱ्या आठ वर्षांच्या विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. धोंडवीरनगर शिवारातील सॅक्रेट हार्ट पब्लिक स्कूलमध्ये ही घटना घडली.
हेदेखील वाचा : Buldhana: लाडक्या बहीण योजनेच्या पैशांवर डल्ला! पत्नी माहेरी गेली अन् नवऱ्याने दुसरीच ‘बायको’ बँकेत उभी केली