'तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही डायरेक्ट छातीवर मारतो' असे स्टेट्स ठेवणाऱ्या तरूणाची भरदिवसा हत्या; गावठी कट्ट्याने केले 12 राउंड
नागपूर : पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भांडेवाडी रेल्वे रुळाजवळ एका 35 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली. सतीश कालीदास मेश्राम (वय 35, रा. एकतानगर, पारडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश हा सेंट्रींगचे काम करत होता व त्याला दारूचे व्यसन होते. गुरुवारी (ता. १) रात्री तो एका मित्रासोबत घरातून बाहेर पडला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. शुक्रवारी सकाळीही तो घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी पारडी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास भांडेवाडी रेल्वे रुळाजवळ निर्जनस्थळी त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
मोबाईल चोरी केल्याची माहिती
दरम्यान, पोलिसांनी त्याच्या मोबाईलच्या लोकेशनच्या आधारे तपास सुरू केला. प्राथमिक तपासात सतीशने एका लग्नाच्या रिसेप्शनमधून मोबाईल चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. त्या प्रकरणातूनच त्याचा खून झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.
खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट
अद्याप खून नेमका कशामुळे झाला, याबाबतची माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, सतीशच्या मित्रांचेही जबाब नोंदवले जात आहेत. या प्रकरणाने पारडी परिसरात खळबळ उडाली आहे.