Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Father Kills Son: मालमत्तेच्या वादातून पोटच्या ७ वर्षांच्या मुलाचा बापानंच आवळला गळा अन् शेतातील नाल्यातून…

Father Kills Son: लातूरमध्ये रक्ताचं नातं विसरला बाप! मालमत्तेच्या वादातून ७ वर्षांच्या पोटच्या मुलाचा गळा आवळून खून; शेतातील नाल्यात मृतदेह फेकून पळालेल्या नराधम बापाला परभणीतून अटक, थरारक घटनेने शहर सुन्न!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 09, 2026 | 11:33 AM
Father Kills Son: मालमत्तेच्या वादातून पोटच्या ७ वर्षांच्या मुलाचा बापानंच आवळला गळा अन् शेतातील नाल्यातून...

Father Kills Son: मालमत्तेच्या वादातून पोटच्या ७ वर्षांच्या मुलाचा बापानंच आवळला गळा अन् शेतातील नाल्यातून...

Follow Us
Follow Us:
  • मालमत्तेच्या वादातून पित्याने ७ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला
  • ५ नोव्हेंबरपासून बेपत्ता मुलाचा कुजलेला मृतदेह शेतातील नाल्यातून सापडला
  • परभणीत पळून गेलेल्या आरोपी बापाला पोलिसांनी केली अटक 
Father Kills Son: मालमत्तेतील हक्कावरून सुरू असलेल्या अत्यंत टोकाच्या आणि संतापजनक कौटुंबिक वादातून एका बापानं आपल्या अवघ्या ७ वर्षांच्या अबोध मुलाचा गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची भयानक घटना लातूरमधील सुळ गल्ली परिसरात उघडकीस आली आहे. अरमान युसूफ सय्यद (वय ७) असे मृत बालandचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी पिता युसूफ मुबारक सय्यद (वय ५८) याला परभणीतून शिताफीने अटक केली आहे. या घटनेमुळे लातूर शहर व परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा: Fire Incidents: “लक्ष्मीपूजनाच्या रात्री मुंबई अन् ठाण्यात कुठे काय घडलं? १७ मजली इमारतीला आगीसह अनेक ठिकाणी अग्नितांडव…

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी युसूफ सय्यद याला दोन पत्नी आहेत. पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुले असून, दुसऱ्या पत्नीचा अरमान हा एकुलता एक मुलगा होता. युसूफने यापूर्वीच पहिल्या पत्नीच्या दोन्ही मुलांना मालमत्तेत वाटणी दिली होती. त्यामुळे “माझ्या मुलालाही मालमत्तेत समान वाटा मिळाला पाहिजे,” अशी मागणी दुसरी पत्नी सातत्याने करत होती. यावरून पती-पत्नीत वारंवार खटके उडत व वाद सुरू होते.

गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी रात्री युसूफ हा लहानगा अरमान याला सोबत घेऊन घरातून बाहेर पडला आणि त्यानंतर रात्रभर घरी परतला नाही. दोघेही अचानक बेपत्ता झाल्याने चिंतेत पडलेल्या दुसऱ्या पत्नीने तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन मुलं व पती गायब असल्याबाबत तक्रार दाखल केली.

हेही वाचा: Family Harassment: “पती-सासऱ्यांच्या शारीरिक-मानसिक त्रासाने घेतला बळी! ५ दिवसांच्या संघर्षानंतर शेवटी…

सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्त्वाचे

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये ५ नोव्हेंबरच्या रात्री ९:३० वाजेच्या सुमारास युसूफ हा अरमानचा हात धरून घरामागील शेताकडे जाताना स्पष्ट दिसून आला. मात्र, तासाभराने तो एकटाच घराकडे परतताना कॅमेऱ्यात कैद झाला. या संशयास्पद फुटेजच्या व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी शोध घेत आरोपी युसूफला परभणी येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर रविवारी (८ नोव्हेंबर) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरामागील शेतातील नाल्याच्या पानातून अरमानचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात आला.

लातूर शहराचे पोलीस उपअधीक्षक समिरसिंह साळवे यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितले की, “मिसिंग असलेल्या मुलाचा मृतदेह शेतातील नाल्यात आढळला असून तो कुजलेला होता. ५ नोव्हेंबर रोजीच त्याचा खून झाला असावा असा अंदाज आहे. मालमत्तेच्या वादातूनच हा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे.” दरम्यान, या कायदेशीर बाबींवर बोलताना कायदेतज्ज्ञांच्या मते, मुस्लिम पर्सनल लॉ अंतर्गत पुरुषाला एकापेक्षा अधिक विवाह करण्याची परवानगी असली, तरी कायद्यानुसार पहिल्या किंवा दुसऱ्या कोणत्याही पत्नीपासून झालेली वैध मुले वडिलांच्या मालमत्तेतील वारसाहक्कापासून वंचित राहू शकत नाहीत. पहिल्या पत्नीच्या मुलांप्रमाणेच दुसऱ्या पत्नीच्या मुलालाही मालमत्तेत समान हक्क मिळतो. असे असूनही केवळ विकृत मानसिकतेतून हा घातपात केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: लातूरमध्ये ही खळबळजनक घटना कोणत्या परिसरात घडली?

    Ans: ही घटना लातूरमधील सुळ गल्ली परिसरात घडली.

  • Que: मृत मुलाचे नाव काय असून आरोपी कोण आहे?

    Ans: मृत बालकाचे नाव अरमान युसूफ सय्यद (वय ७) असे असून, आरोपी त्याचे वडील युसूफ मुबारक सय्यद (वय ५८) हे आहेत.

  • Que: पोलिसांनी आरोपीला कुठून आणि कसे पकडले?

    Ans: परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी आरोपी युसूफला परभणी येथून ताब्यात घेतले.

Web Title: Latur property dispute father murders 7 year old son parbhani arrest sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • father killed son
  • Latur Crime
  • Latur news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Parking Dispute Murder: कार पार्किंग आणि कुत्र्यावरून झालेल्या वादातून टेक महिंद्राच्या आशिया प्रमुखाची गोळ्या झाडून हत्या!
1

Parking Dispute Murder: कार पार्किंग आणि कुत्र्यावरून झालेल्या वादातून टेक महिंद्राच्या आशिया प्रमुखाची गोळ्या झाडून हत्या!

Murder Case: पाणी मागताच तोंडावर लघुशंका! छत्रपती संभाजीनगरात जुन्या वादातून तरुणाचा घेतला बळी; पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर आरोप!
2

Murder Case: पाणी मागताच तोंडावर लघुशंका! छत्रपती संभाजीनगरात जुन्या वादातून तरुणाचा घेतला बळी; पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर आरोप!

Nashik Honor Killing: भेटायला बोलावून तरुणाचा काटा काढला; बहिणीच्या प्रेमसंबंधाच्या रागातून धारदार चाकूने हत्या!
3

Nashik Honor Killing: भेटायला बोलावून तरुणाचा काटा काढला; बहिणीच्या प्रेमसंबंधाच्या रागातून धारदार चाकूने हत्या!

Pune Murder Case: मित्राचाच निघाला काळ! दारूच्या नशेत केली निर्घृण हत्या, धड अन् पाय वेगळे करून वेगवेगळ्या गल्लीत फेकले!
4

Pune Murder Case: मित्राचाच निघाला काळ! दारूच्या नशेत केली निर्घृण हत्या, धड अन् पाय वेगळे करून वेगवेगळ्या गल्लीत फेकले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.