
राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली; AQI पोहोचला 'गंभीर' श्रेणीत
नवी दिल्ली राजधानी दिल्लीत प्रदूषणाची स्थिती गंभीर बनताना दिसत आहे. दिल्लीत हवा विषारी होत आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, दिल्लीतील अनेक भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ‘अत्यंत वाईट’ श्रेणीत पोहोचला. बवानामध्ये परिस्थिती विशेषतः गंभीर असून, येथील AQI हा 403 वर पोहोचला आहे. जो ‘गंभीर’ श्रेणीत येतो आणि आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.
राजधानी दिल्लीतील हवा विषारी होताना दिसत आहे. शनिवारी, अनेक भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ‘अत्यंत वाईट’ श्रेणीत नोंदवला गेला. बवानाचा AQI गंभीर श्रेणीत पोहोचला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) ताज्या आकडेवारीनुसार, बवानामध्ये ४०३ चा AQI नोंदवला गेला आहे. इतर भागातील परिस्थिती देखील चिंताजनक आहे. आनंद विहारमध्ये ३६८, रोहिणी ३७१, अलीपूर ३६२, अशोक विहारमध्ये ३७२, चांदणी चौकात ३६७, आयटीओ ३८०, जहांगीरपूर ३७१, द्वारका सेक्टर-८ मध्ये ३१३ आणि आयजीआय विमानतळ (टी-३) मध्ये २७१ अशी नोंद झाली.
दरम्यान, अक्षरधामच्या आसपासच्या परिसरात जिथे विषारी धुराचा थर दिसून येत आहे. येथील एक्यूआय ३६८ वर ‘अत्यंत वाईट’ श्रेणीत राहिल्याचे पाहिला मिळाले.
हिवाळा सुरु होताच प्रदूषण वाढले
दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा सुरू होताच, वायू प्रदूषणाचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. यापूर्वी, हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत पोहोचली होती. ती आता कायम असल्याचे दिसून येते. सकाळची सुरुवात धुके आणि हलक्या धुक्याने झाली, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होताना दिसत आहे. दिवसभर हलके धुके राहण्याची शक्यता आहे. या काळात, हवेचा दर्जा निर्देशांक (AQI) 403 वर नोंदवला गेला.
व्यावसायिक वाहनांवर बंदी
राजधानी दिल्लीत प्रदूषण वाढताना दिसत आहे. दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. एक नोव्हेंबरपासून राजधानीत प्रदूषण करणाऱ्या व्यावसायिक वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ‘एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशन’ने (CAQM) हा निर्णय घेतला. सर्व बॉर्डर्सवर कडक देखरेखीचे आदेश दिले जेणेकरून कोणतेही वाहन नियमांचे उल्लंघन करणार नाही याची खात्री करता येईल.
हेदेखील वाचा : दिल्लीमधील वाढते वायू प्रदूषण आरोग्यासाठी बनतंय खूप धोकादायक; कायमस्वरुपी उपाययोजनांची गरज