२६ वर्षांनंतर दिल्लीत ‘रेखा’पर्वाला सुरुवात (फोटो सौजन्य-X)
२७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज पुन्हा एकदा दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर १२ दिवसांनी दिल्लीला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. रामलीला मैदानावर होणाऱ्या शपथविधीची सोहळा पार पडला असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्यतिरिक्त, सर्व प्रमुख केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते आणि अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती होती. शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत वाहतूक विषयक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवीन मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा संपली आहे. रेखा गुप्ता (Delhi CM Rekha Gupta) यांनी गुरुवारी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी रामलीला मैदानावर त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
यावेळी रेखा गुप्ता भगव्या साडीत दिसल्या. त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. त्यांच्या आधी आतिशी, शीला दीक्षित आणि सुषमा स्वराज दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री राहिल्या आहेत. रेखा गुप्ता या शालीमार बागच्या आमदार आहेत. त्यांनी तीन वेळा आम आदमी पक्षाच्या आमदार बंदना कुमारी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे.
रेखा गुप्ता यांच्यानंतर, एलजी विनय कुमार सक्सेना यांनी इतर मंत्रिमंडळ सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. रेखा गुप्ता यांच्यानंतर प्रवेश वर्मा यांनी दिल्लीचे मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर आशिष सूद यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर मनजिंदर सिंग सिरसा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
रविंदर सिंह इंद्रराज यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यानंतर कपिल मिश्रा आणि पंकज सिंह यांनी शपथ घेतली. आज सकाळीच राजपत्र जारी करून या सर्व लोकांची नावे जाहीर करण्यात आली. शपथविधीनंतर प्रत्येकाच्या मंत्रिपदाचा निर्णय घेतला जाईल. भाजपने आपल्या मंत्रिमंडळाच्या घोषणेने जाती आणि समुदायांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये जाट, पंजाबी आणि पूर्वांचल या सर्वांची काळजी घेण्यात आली आहे.
दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्रिमंडळ सदस्य, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, खासदार आणि एनडीए घटक पक्षांचे नेते उपस्थित आहेत. त्याच वेळी, कार्यक्रमात इतर मान्यवरांसह ५० हजार नेते, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते.
बुधवारी रात्री भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रेखा गुप्ता यांनी अभाविपमधून विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला. त्या दोनदा दिल्लीच्या नगरसेवक आणि महापौरही राहिल्या आहेत. त्यांचे आरएसएसशी चांगले संबंध असल्याचेही म्हटले जाते. रेखा गुप्ता ही भाजपच्या अशा बोलक्या नेत्यांपैकी एक मानली जाते जी समकालीन मुद्द्यांवर उघडपणे आपले मत व्यक्त करतात.