नवी दिल्ली : गुरुग्राममध्ये भीषण रस्ता (Gurugram Road Accident) अपघातात एका मुलीसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्वजण राजस्थानच्या उदयपूर येथे पर्यटन (Udaypur Tour) करून परतत होते. ही इनोव्हा (Innova) गुरुग्रामच्या एनएच ४८ (NH 48)वर येताच समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकला धडकली. यानंतर अनियंत्रित ट्रक इनोव्हावर पलटी झाला, त्यामुळे कारमध्ये बसलेले सर्व जण चिरडले.
गुरुग्राम पोलीस (Gurugram Police) ठाण्याच्या हद्दीत रात्री उशिरा पावणेदोन वाजता भरधाव ट्रक रस्त्यावरून जाणाऱ्या इनोव्हा वाहनावर उलटल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. गुरुग्राम पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, इनोव्हा बसलेले लोक राजस्थानच्या उदयपूर येथे फिरून परतत होते. तेथून ते आपल्या घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला.