
New Delhi : आता जंतर-मंतर नाही, तर 'या' ठिकाणी करावं लागणारं आंदोलन, दिल्ली पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जाहिर
जंतर-मंतरवर होणाऱ्या आंदोलनाबाबत गृहमंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता जंतर-मंतरवर कोणालाच आंदोलन करण्याची परवानगी नसेल. दिल्ली पोलिसांनी (New Delhi ) आंदोलनासाठी एक नवी मार्गदर्शन सूचना (Guidelines)जाहीर केल्या आहेत. हा निर्णय गृहमंत्रालयाच्या कमेटीच्या शिफारशीच्या आधारे घेण्यात आला आहे.
दिल्ली पोलीस याबाबत म्हणाले की, भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने नागरिकांना आपलं आंदोलन करण्यासाठी सध्याच्या ‘निश्चित जागे’शिवाय इतर योग्य ठिकाणांचा शोध घेण्यासाठी एक समिती बनवली होती. समितीच्या सिफारशीच्या आधारे जंतर-मंतरवर आता आंदोलन करता येणार नाही.
आता रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि सीबीडी मैदान (पूर्व दिल्ली) या तीन ठिकाणीच विरोधक अथवा सामान्य नागरिकांना आपलं आंदोलन करण्याची परवानगी असेल. या तीन जागांवर आंदोलन करण्यासाठी विस्तृत व संसोधित एसओपी (प्रमाणित कार्यपद्धती) नंतर प्रसिद्ध केली जाईल. दिल्ली पोलिसांचे हे आदेश 28 एप्रिल 2022 च्या जुन्या स्टँडिंग ऑर्डरचे अंशकालीन बदल आहेत.
दिल्लीच्या मध्यभागी स्थानी असलेल्या जंतर-मंतरला विरोधक अथवा आंदोलनकर्त्यांनी आपली नेहमीच पसंती दर्शवली आहे. सध्या कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी)ने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतरवर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता.
हे आंदोलन थांबवण्यासाठी पोलीस व प्रशासनाने अनेक पावलं उचलली. सीजेपी प्रमुख अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवर पोहचण्याआधीच ताब्यात घेतले होते.
या आंदोलनासाठी दिल्ली सरकारला जवळपास 45 मेट्रो स्टेशन बंद करावे लागले होते. त्यासोबतच अनेक ट्रेनही रद्द करण्यात आल्या होत्या. यामुळे सर्वसामान्य जनतेलाही त्याचा त्रास सहन करावा लागला होता. सरकारने जंतर-मंतरवर वारंवार होणाऱ्या आंदोलनामुळे नागरिकांना होणारा त्रास पाहता हे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
या काळात दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी सोमवारी नवी दिल्ली आणि मध्य दिल्लीमधील शक्यता असलेल्या अडचणीबाबत प्रवाशांना इशारा दिला. मार्गदर्शक सूचनेनुसार, विरोधी पक्षाच्या प्रस्तावित आंदोलनादरम्यान ट्रॅफिक व्यवस्थापन आणि सुरक्षा कायम राखण्यासाठी जवळपास 30 ठिकाणी नाकाबंदी व मार्गबदलण्यात आले आहेत.
धौला कुआं फ्लायओव्हर, झंडेवालान, पटेल चौक, पंचकुइयां, कनॉट प्लेस, मंडी हाउस, लोधी रोड फ्लायओवर, भीकाजी कामा प्लेस आणि मोती बाग फ्लायओवरसमवेत अनेक मुख्य रस्ते आणि चौकांवर त्याचा प्रभाव पडू शकतो.
इतर मार्ग जिथे प्रवाशांना बंदी वा उशीर होण्याचा सामना करावा लागू शकतो, ज्यात जंतर-मंतर रोड, अशोक रोड, संसद मार्ग आणि टॉल्स्टॉय मार्गाचा समावेश आहे.
Rahul Gandhi : राहुल गांधींचा मोठा निर्णय! ‘उद्या संपूर्ण भारत सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणार’