Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Assembly election 2024 : अखेर ठरलं! बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार देणार लढत

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या पक्षातील उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये अजित पवार हेच बारामतीचा गड राखणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 23, 2024 | 01:13 PM
ajit pawar is Baramati Vidhan Sabha Constituency Candidate

ajit pawar is Baramati Vidhan Sabha Constituency Candidate

Follow Us
Close
Follow Us:

बारामती : विधानसभा निवडणणुकीचे बिगुल वाजले आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजप, शिंदे गट आणि त्यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने देखील उमेदवार जाहीर केले आहेत. अजित पवार यांच्या पक्षाने पहिली यादी जाहीर करत 38 उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये सर्वांत जास्त लक्ष हे बारामती मतदारसंघाकडे लागले होते. अखेर याबाबत निर्णय जाहीर झाला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या पक्षाने 38 उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये सर्व प्रमुख नेत्यांसह बारामती विधानसभा मतदारसंघाची देखील उमेदवारी जाहीर केली आहे. बारामतीमधून अजित पवार हेच विधानसभेला लढत देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही यादी जाहीर केली आहे. अजित पवार हेच बारामतीचे राष्ट्रवादीचे शिलेदार राहणार असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.

हे देखील वाचा : पुण्यातील गोल्डमॅन रमेश वांजळेंच्या मुलाला उमेदवारी जाहीर; राज ठाकरेंनी शब्द पाळला

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये देखील बारामती मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभेच्या निकालानंतर आता विधानसभेमध्ये कोण बाजी मारणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार हे बारामती मतदारसंघ सोडणार असल्याचे बोलले जात होते. बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार हे त्यांच्या ऐवजी त्यांच्या मुलाला संधी देणार असल्याचे बोलले जात होते. मात्र बारामतीचा गड अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवला आहे.

हे देखील वाचा : गुलाल नाय उधळला तर फाशी घेऊन मरेन…; ‘या’ नेत्याने दिले थेट चॅलेंज

शरद पवार गटाकडून बारामतीसाठी नवीन दादा शोधण्याचे काम सुरु होते. लोकसभा निवडणुकीनंतर रोहित पवार हे बारामतीमध्ये लढत देणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता अजित पवार यांचे पुतणे व शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार हे बारामती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये येणार असल्याची दाट शक्यता आहे. रोहित पवार हे त्यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये निवडणूक लढणार असून युगेंद्र पवार हे बारामतीमधून लढणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार कुटुंबामध्ये लढत होणार आहे. काका विरुद्ध पुतण्या अशी बारामती विधानसभा निवडणूक रंगणार आहे.

Web Title: Ajit pawar will be the only candidate from baramati assembly constituency 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 01:13 PM

Topics:  

  • ajit pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : “मुद्दामून त्या पक्षाचे नेते त्यांना स्वत:च…; NCP विलीनीकरणावर रोहित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका
1

Maharashtra Politics : “मुद्दामून त्या पक्षाचे नेते त्यांना स्वत:च…; NCP विलीनीकरणावर रोहित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका

Ajit Pawar Plane Crash Conspiracy: अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार की वाढणार; तपास ब्युरोची मोठी अपडेट
2

Ajit Pawar Plane Crash Conspiracy: अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार की वाढणार; तपास ब्युरोची मोठी अपडेट

शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी
3

शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी

अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मोठी अपडेट; रोहित पवारांनी उचललं मोठं पाऊल
4

अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मोठी अपडेट; रोहित पवारांनी उचललं मोठं पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.