Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरात बसून कारभाराची सवय गेली नाही…; मातोश्रीवरुन जाहीर झालेल्या वचननाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मात्र मातोश्रीवरुन हा प्रसिद्ध केल्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 07, 2024 | 02:24 PM
Chandrashekhar Bawankule target uddhav thackeray

Chandrashekhar Bawankule target uddhav thackeray

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहे. प्रचारासाठी अवघा एक आठवडा राहिला असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहे. दिल्लीतील अनेक नेते राज्यामध्ये प्रचारासाठी तंबू ठोकून बसले आहेत. तसेच पक्षाकडून जाहीरनामा देखील प्रसिद्ध केले आहेत. यापूर्वी अजित पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा देखील वचननामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. मातोश्रीवरुन उद्धव ठाकरे यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यावरुन आता भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा मातोश्रीवरुन प्रसिद्ध केला. यावेळी ते म्हणाले की, मुंबई व महाराष्ट्राचं गृहनिर्माण धोरण ठरवण्यात येणार आहे. इतर शहरातील झोपडपट्ट्यांचा विकास करणार आहोत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द केला जाईल. कोळीवाडीची ओळख पुसू देणार नाही. कोळीवाड्यांचा क्लस्टरचा जीआर रद्द करू, राज्यातील बेरोजगारी दूर करू, भूमिपुत्रांना नोकरी देऊ, मुलांना मोफत शिक्षण देऊ, जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू, आदी आश्वासने उद्धव ठाकरेंनी दिली आहेत. शिवसेनेच्या वतीने महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही काय करणार, आम्ही जनतेची सेवा कशी करू, याचे आश्वासन मी जनतेसमोर ठेवले आहे. जनता…होय…आम्ही जे बोलतो तेच करतो. आम्ही अनेक आश्वासने पूर्ण केली आहेत आणि आजही जनतेचा आशीर्वाद मिळाल्यावर आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

हे देखील वाचा : “मुलांना मोफत शिक्षण, जीवनावश्यक वस्तूंचं दर…”, ठाकरेंच्या शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध

त्यांच्या या वचननाम्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. बावनकुळे म्हणाले की, अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला. अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरतं राजकारण केलं. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत प्रत्येक वचननामा शिवसेना भवनात प्रकाशित केला. कारण त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं. पण सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कुटुंबचं आहे. उद्धवजी नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.

हे देखील वाचा : आधी जोरदार टीका नंतर दिलगिरी; वादग्रस्त विधानानंतर सदाभाऊ खोत यांचा ‘यू टर्न’

Web Title: Bjp state president chandrashekhar bawankule is aggressive after uddhav thackeray released a manifesto on matoshree

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 12:36 PM

Topics:  

  • Chandrasekhar Bawankule
  • Maharashtra Assembly election 2024
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “…स्वत:ची उंची कमी करून घेऊ नये”; बावनकुळेंचा उपमुख्यमंत्र्यांना सल्ला
1

Maharashtra Politics: “…स्वत:ची उंची कमी करून घेऊ नये”; बावनकुळेंचा उपमुख्यमंत्र्यांना सल्ला

BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीत मुस्लिम मतदारांचा कल कुणाकडे, PM मोदींचा प्रभाव किती? सर्वेक्षणातील महत्त्वाचे खुलासे
2

BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीत मुस्लिम मतदारांचा कल कुणाकडे, PM मोदींचा प्रभाव किती? सर्वेक्षणातील महत्त्वाचे खुलासे

Pune Municipal Election 2026: पुण्यात ठाकरेंच्या गडाला सुरूंग; अधिकृत उमेदवारांचाच भाजपमध्ये प्रवेश
3

Pune Municipal Election 2026: पुण्यात ठाकरेंच्या गडाला सुरूंग; अधिकृत उमेदवारांचाच भाजपमध्ये प्रवेश

BMC Election 2026: मुंबईत ठाकरे ब्रँड की शिंदेंची सत्ता…; ‘त्या’ ६९ मतदारसंघांत मुंबईकर कोणाच्या बाजूने?
4

BMC Election 2026: मुंबईत ठाकरे ब्रँड की शिंदेंची सत्ता…; ‘त्या’ ६९ मतदारसंघांत मुंबईकर कोणाच्या बाजूने?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.