Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजकारणातील सर्व पुतण्यांचा DNA सारखाच…; घरातील बंडानंतर छगन भुजबळांचा रोख कोणाकडे?

छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना अप्रत्यक्षपणे अजित पवारांना टोला लगावला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 25, 2024 | 02:59 PM
Chhagan Bhujbal's reaction on Sameer Bhujbal political decision

Chhagan Bhujbal's reaction on Sameer Bhujbal political decision

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण रंगले आहे. अनेक नेते विधानसभेसाठी इच्छुक असले तरी निवडक नेत्यांना संधी मिळाली आहे. तीन पक्ष एकत्र आल्यामुळे जागावाटपामध्ये अनेकांच्या संधी गेल्या आहेत. त्यामुळे पक्षांतर देखील वाढली आहे. नाशिकमध्ये भुजबळ घरामध्ये बंडखोरी झाली आहे. मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ते अपक्ष लढणार आहेत. यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माजी खासदार समीर भुजबळ यांनी पक्षातून राजीनामा दिला असून 28 तारखेला ते नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यामुळे आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देऊन मत व्यक्त केले आहे. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, राजकारणात असलेल्या सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच आहे. शरद पवारांचा पुतण्या, गोपीनाथ मुंडेचा पुतण्या, बाळासाहेब ठाकरे यांचा पुतण्या, राजकारणातील सगळेच पुतणे यांचे डीएनए सारखाच आहे, असे त्यांनी म्हटले आहे. छगन भुजबळांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांच्यावर टीका करताना अजित पवार यांना देखील टोला लगावला आहे.

हे देखील वाचा : शरद पवारांना फोडाफोडीचे नोबेल पारितोषिकच दिले जावे…; खासदार उदयनराजे भोसले यांची टीका

पुढे छगन भुजबळ म्हणाले की, “भुजबळ कुटुंबीयांना अनेक अडचणीतून जावे लागत आहे. त्यामुळे भुजबळ कुटुंबियांना विचार करावाच लागतो. किती दिवस ते मला विचारतील, इकडे जाऊ का? तिकडे जाऊ का? ते आता मोठे झालेत, त्यांचे निर्णय त्यांना घेवू द्या आणि त्यांनाही आता राजकारण कळतं ना, त्यांनी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, याबाबत त्यांचाही अभ्यास झाला आहे,” असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : ‘अजितदादांनी मला अंधारात ठेवून केसाने गळा कापला…’; नाराज नेत्याची जहरी टीका

समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, “राष्ट्रवादी कॉंग्रेसने वर्षभरापूर्वी आपल्यावर विश्वास ठेवून पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सुपूर्द केली होती. जबाबदारी पार पडत असताना प्रतिकूल परिस्थितीत संघटन मजबुतीने उभे केले. मात्र भुजबळ कुटुंबीयांचे ऋणानुबंध असलेल्या नांदगावमध्ये परिस्थिती अतिशय खूपच बिकट आहे. गेल्या पाच वर्षात या मतदारसंघातले वातावरण दूषित बनलं आहे. नांदगावमधील नागरिकांनी आपली भेट घेऊन याबाबत कैफियत मांडली होती. नागरिकांची मागणी आणि दहशतीचे वातावरण बदलण्यासाठी या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुंबई अध्यक्षपदाचा मी राजीनामा देत आहे,” असं समीर भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Web Title: Chhagan bhujbals reaction after sameer bhujbal took a different stand before vidhansabha elections 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 02:59 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • Maharashtra Assembly election 2024
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Nashik Rainfall News: अतिवृष्टीने नाशिकमध्ये हाहा:कार; भुजबळ दौरा सोडून नाशिककडे रवाना
1

Nashik Rainfall News: अतिवृष्टीने नाशिकमध्ये हाहा:कार; भुजबळ दौरा सोडून नाशिककडे रवाना

‘आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही’; छगन भुजबळांची टीका
2

‘आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही’; छगन भुजबळांची टीका

Thane News : सत्ताधाऱ्यांची मेट्रोच्या नावाने निवडणुकीची चाचपणी; जनहित याचिका दाखल करण्याचा काँग्रेसचा इशारा
3

Thane News : सत्ताधाऱ्यांची मेट्रोच्या नावाने निवडणुकीची चाचपणी; जनहित याचिका दाखल करण्याचा काँग्रेसचा इशारा

‘कोणत्याही नेत्यांचा अपमान खपवून घेणार नाही, सत्तेची ही मस्ती उतरवू’; शशिकांत शिंदेंचा इशारा
4

‘कोणत्याही नेत्यांचा अपमान खपवून घेणार नाही, सत्तेची ही मस्ती उतरवू’; शशिकांत शिंदेंचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.