photo Credit- Social Media निवडणूक आयोगाने नाकारली अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जाहिरात
गोंदिया : विधानसभा निवड़णुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसह महाविकास आघाडीचे नेते राज्यातील उमेदवारांची नावं जाहीर करत आहेत. यंदाची विधानसभा ही अत्यंत महत्त्वाची असून प्रतिष्ठेची ठरणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढणार आहेत. युतीमुळे जागावाटपामध्ये अनेकांच्या महत्त्वकांशेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे नाराज नेते हे पक्षांतर करुन तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता अजित पवार यांच्यावर गोंदियामधील नाराज नेत्यांनी जहरी टीका केली आहे.
गोंदिया अर्जुनी मोरगाव मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार हे अजित पवार गटामध्ये होते. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना डावलून महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला देण्यात आला. त्यामुळे मनोहर चंद्रिकापुरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने माजी मंत्री राजकुमार बडोले यांना पक्षामध्ये घेत त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विद्यमाव आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी अजित पवारांवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
मनोहर चंद्रिकापुरे यांनी अजित पवार यांना सोडून तिसऱ्या आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. अजितदादांनी मला अंधारात ठेवून केसाने गळा कापला असा आरोप आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला आहे. माध्यमांसमोर आपली भूमिका जाहीर करताना चंद्रिकापुरे यांनी बच्चू कडू यांचीसोबत देण्याचा निर्णय घेतला. मनोहर चंद्रिकापुरे म्हणाले की, “माझ्या मुलाला मी निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे आणि त्याच्या पाठीशी उभा असेल.. अजित दादांनी मला अंधारात ठेवून माझा केसाने गळा कापला,” असा घणाघात मनोहर चंद्रिकापुरे यांनी अजित पवारांवर केला.
हे देखील वाचा : झिशान सिद्दिकींचे वडिलांच्या पावलावर पाऊल! आता ठाकरेंना देणार थेट टक्कर
पुढे मनोहर चंद्रिकापुरे म्हणाले की, “जर दादांनी मला म्हटलं असतं चंद्रिकापुरे तुमचा परफॉर्मन्स बरोबर नाही. बडोले तुमच्यापेक्षा समोर आहेत तर मीच तिकिट देऊ नका असं म्हटलं असतं. माझ्या पाठीत खंजीर खुपसल्याचा जयंत पाटील यांना देखील खूप दुःख झालं. पण वाटाघाटी झाल्यामुळे आम्ही काहीच करू शकणार नाही, असे ते म्हणाले. आशीर्वाद देणारे हात जर पाठीत खंजीर खुपसणार असतील तर त्या वेदना असह्य होतात. प्रफुल पटेल साहेब जर तुम्हाला आम्हाला मारायचेच होतं तर पाणी प्यायला थोडी उसंत द्यायला पाहिजे होती. किती क्रूरपणे निर्णय घेतला आणि एका निष्पाप माणसाच्या बळी घेतला याचा बदला जनता घेईल. फितूर आणि विश्वासघाती लोकांना या मतदारसंघातील नागरिक धडा शिकवतील,” अशा कडक शब्दांत मनोहर चंद्रिकापुरे यांनी अजित पवार यांना खडेबोल सुनावले आहे.