Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुहास कांदेंची भुजबळांच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ; छगन भुजबळ यांनी दिली प्रतिक्रिया

नांदगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांनी शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. यांच्या शिवीगाळ प्रकरणावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 29, 2024 | 12:45 PM
'जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना'; छगन भुजबळांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

'जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना'; छगन भुजबळांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : नांदगाव विधानसभा मतदारसंघा मागील अनेक दिवसांपासून नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत आला आहे. महायुतीमध्ये नांदगाव हा शिंदे गटाच्या वाट्याला आला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून सुहास कांदे यांना उमेदवारी आली आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काल झालेल्या समीर भुजबळ यांच्या सभेत नांदगांव लोकशाही धडक मोर्चाचे पदाधिकारी शेखर पगार यांनी आमदार सुहास कांदे हे दहशत पसरवित दादागिरी करत असल्याचा आरोप केला. समीर भुजबळांच्या सभेतच शिवीगाळाची कॉल रेकॉर्डिंग ऐकवण्यात आली. त्यामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राजकारण तापले आहे. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ सुहास कांदे यांच्या शिवीगाळ प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी काही तिथे गेलो नव्हतो. तो अपक्ष उभा राहिलेला आहे. समीरने फॉर्म भरला आहे. काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सुहास कांदे शिवीगाळ करत आहे असे त्या व्हिडिओमधून दिसून येत आहे. शेखर पगार यांनी भाषण केल्यावर सुहास कांदेंनी तिकडून शिवीगाळ सुरू केली. पगार हुशार होते त्यांनी माईक समोर मोबाईल धरला. सगळ्या नांदगावमध्ये स्पीकर लावले होते. घाणेरड्या शिव्या आणि दमबाजी दिसून आली. विनोद शेलार आणि समीर भुजबळ यांना शिव्या देण्यात आल्या. म्हणूनच भयमुक्त नांदगाव ही टॅगलाईन समीरने घेतली आहे. या क्लिप ऐकल्या तर का घेतली आहे हे सर्वांना समजेल. सामान्य जनता बोलू शकणार नाही असे आहे, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

हे देखील वाचा : वृद्धांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा! पंतप्रधान मोदींकडून आरोग्य विमा जाहीर, कसा कराल अर्ज?

पुढे ते म्हणाले की, पोलिसांनी आणि महसूल विभागाने कारवाई करायला पाहिजे. अधिकारी प्रेशर खाली काम करत आहे. निवडणूक आयोगाने लक्ष दिले पाहिजे. योग्य ती कारवाई केली पाहिजे. लोकांना भयमुक्त वातावरणात मतदान करू दिले पाहिजे. निवडणूक आयोगाने भेदभाव करता कामा नये, योग्य असेल तेच करावे. इतर पक्षातील लोकांना, कार्यकर्त्यांना भीती दाखवली जात आहे. ते सगळे समीरला मदत करतील. त्यांनी विकास केला नाही, केवळ भीती दाखवली आहे. बाळासाहेब ठाकरे यांना कांदेंनी पाहिले नाही, समीर तर बाळासाहेबांच्या जवळ खेळला आहे. समीर भुजबळ स्थानिक प्रश्न मांडत आहे कोणताही नेता, अथवा पक्षाबाबत समीर बोलला नाही, असे म्हणत छगन भुजबळ यांनी सुहास कांदे यांनी शिवीगाळ प्रकरणावरुन राग व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा : भाजपची चौथी यादी जाहीर, मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता यांना तिकीट, उमरेडमधून कोण?

Web Title: Chhagan bhujbals reaction to the abuse case of suhas kande in nandgaon assembly constituency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 12:45 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahayuti
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील
1

Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील

Ajit Pawar Vs Mahesh Landge : पिंपरी चिंचवड निवडणूक पवार – लांडगे वादाने कोणत्या दिशेने?
2

Ajit Pawar Vs Mahesh Landge : पिंपरी चिंचवड निवडणूक पवार – लांडगे वादाने कोणत्या दिशेने?

Maharashtra Politics: “दुश्मनी केली तर ती…”; कॉँग्रेसविरुद्ध धडाडली एकनाथ शिंदेंची तोफ
3

Maharashtra Politics: “दुश्मनी केली तर ती…”; कॉँग्रेसविरुद्ध धडाडली एकनाथ शिंदेंची तोफ

Muncipal Corporation Elections : “लातूर शहर दहशत मुक्त करण्यासाठी काँग्रेसला साथ द्या” – अमित देशमुख
4

Muncipal Corporation Elections : “लातूर शहर दहशत मुक्त करण्यासाठी काँग्रेसला साथ द्या” – अमित देशमुख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.