फोटो - सोशल मीडिया
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. मंगळवारपर्यंत राज्यातील सर्व 288 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. मात्र, जागावाटपावरून महाविकास आघाडीत अद्यापही रस्सीखेच सुरूच आहे. महाविकास आघाडीत जागावाटपावरून आतापर्यंत झालेल्या वाटाघाटीचा सर्वाधिक फायदा काँग्रेसला झाल्याचे चित्र आहे.
हेदेखील वाचा : माहीम विधानसभा मतदारसंघात येणार रंगत; अमित ठाकरेंविरोधात भाजप देणार नाही उमेदवार? पण…
महाविकास आघाडीत काँग्रेसने मोठा भाऊ बनून शंभरी पार केली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जवळपास 90 जागांवर समाधान मानावे लागू शकते. नवीन वाटाघाटीनंतर काँग्रेस 102 जागांवर निवडणूक लढवू शकते, असे बोलले जात आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रविवारी रात्री उशिरापर्यंत ओढाताण सुरू होती. राजकीय पंडितांनी पूर्वी व्यक्त केलेला 85+85+85 या सूत्राचा अंदाज केवळ कल्पनाविलास ठरला आहे.
आतापर्यंत काँग्रेसने पहिल्या यादीत 48, दुसऱ्या यादीत 22 आणि तिसऱ्या यादीत महाआघाडीत 28, तर महायुतीत 53 जागांचा पेच आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस केवळ तीन दिवसांवर आला आहे. असे असताना राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 260 जागांवर महाविकास आघाडीने, तर 235 जागांवर महायुतीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीत 28, तर महायुतीत 53 जागांची घोषणा होणे अद्याप बाकी आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेसने आतापर्यंत 101 (48+23+16+14), राष्ट्रवादी (शप) पक्षाने 76 (45+22+9), तर शिवसेना (उबाठा) पक्षाने 83 (65+15+3) असे एकूण 246 उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीत भाजपाने 121 (99+22), राष्ट्रवादी काँग्रेसने 49 (38+7+4) आणि शिवसेना शिंदे गटाने 65(45+20) उमेदवारांची घोषणा केली आहे.
18 उमेदवारांची तर रविवारी 14 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 76 उमेदवार (पहिल्या यादीत 45, दुसऱ्या यादीत 22 आणि तिसऱ्यामध्ये उमेदवारांची घोषणा केली आहे.
हेदेखील वाचा : Baramati Assembly Election 2024: बारामतीचा आखाडा रंगणार; अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार मैदानात
महाविकास आघाडीत 85-85-85 जागांवर एकमत?
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं 85-85-85 जागांवर एकमत झाल्याचे सांगितलं जात आहे. 18 जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार आहेत. तरीही 15 जांगाचा घोळ होता. मित्रपक्षांसोबत बैठकही पार पडली. तरी अद्याप काही जागांवर शिक्कामोर्तब झालेले नाही. मित्रपक्षासाठी सोडण्यात आलेल्या 18 आणि शिल्लक 15 जागा अशा एकून 33 जागांबाबत महाविकास आघाडीत अद्यापही संभ्रम होता.






