Congress Leader Priyanka Gandhi Gadchiroli Sabha Live Target Narendra Modi BJP
गडचिरोली : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचार अगदी शेवटच्या टप्यामध्ये आला आहे. भाजपसह कॉंग्रेसचे पक्षश्रेष्ठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी हा प्रचाराच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यानंतर आता प्रियांका गांधी यांनी गडचिरोलीमध्ये सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी महायुतीचा खरपूस समाचार घेतला आहे.
गडचिरोलीमधील प्रचारसभेमध्ये प्रियांका गांधी यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. प्रियांका गांधी म्हणाल्या की, “महाराष्ट्र हा देशाचा आत्मा आहे. महापुरुषांच्या विचारधारेची आणि संघर्षाची ही मार्गदर्शक भूमी आहे. या विचारधारांची मुळं संविधानामध्ये देखील दिसून येतात. येथील संतांनी नेहमी संघटित राहण्याचा, एकत्रित राहण्याचा सल्ला दिला. भेदभाव महाराष्ट्रामध्ये नव्हता. सरकारकडून देखील कधी अशा भेदभावाची वाच्यता करण्यात आली नव्हती,” असे मत प्रियांका गांधी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे प्रियांका गांधी यांनी महाराष्ट्राला मिळणाऱ्या भेदभावावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरले. प्रियांका गांधी म्हणाल्या की, “या आधीचे देशाचे नेतृत्व करणारे नेते कधीही एकाच भागाचा, विभागाचा विकास होईल असे बघत नव्हते. सर्वांना समान वागणूक होती. आता मात्र महाराष्ट्रसोबत भेदभाव केला जात आहे. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले जात आहे. 10 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर गेली. मोदींच्या राज्यात कुणीही सुरक्षित नाही, जिथे आम्ही सरकार बनविले, गॅरंटी दिली, लगेच पूर्ण केली. भाजपाचं या उलट आहे, यांच्याकडे उत्तर नाही,” असा घणघात प्रियांका गांधी यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
नरेंद्र मोदी यांच्या राज्यात फक्त अदानी सेफ
प्रियांका गांधी म्हणाल्या की, “हे भावना भडकावून निवडणूक जिंकतात. यांनी उत्तरदायित्वाची परंपरा संपविली. काहीही बोलायचे आणि जिंकायचे असे चालणार नाही. यांच्या बोलण्यामध्ये तथ्य आणि खरं नाही. फक्त नारेबाजी करत राहतात. मोठ्या मोठ्या घोषणा देतात. एक है तो सेफ है म्हणतात. सेफ हा इंग्रजी शब्द आहे, याचे दोन अर्थ आहे. सुरक्षा व तिजोरी असे त्याचे दोन अर्थ आहे. आणि पूर्ण देशाला माहिती आहे की, तुमच्या राज्यामध्ये फक्त अडाणी सेफ आहेत. हेच अदानी तुमची तिजोरी ठेवतात. नरेंद्र मोदी यांच्या राज्यात शेतकरी, महिला, कष्टकरी, उद्योगधंदे सुरक्षित नाहीत. फक्त रिकामी घोषणाबाजी करतात. निवडणुकीच्या वेळी येतात आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. पण निवडणुकीनंतर याचं काहीच होत नाही,” अशा शब्दांत प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचा समाचार घेतला.