Sam Pitroda's statement on China increases the problems of Congress and Rahul Gandhi
अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा धुराळा उडाला आहे. राष्ट्रीय पक्षांचे दिल्लीचे पक्षश्रेष्ठी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच प्रियांका गांधी देखील महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले आहेत. राहुल गांधी यांची अमरावतीमध्ये सभा पार पडली. यामध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच महायुतीच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.
…यासाठी आमदार खरेदी केले गेले
राहुल गांधी यांनी अमरावतीमध्ये पुन्हा एकदा संविधान वाचवण्यावरुन जनतेला साद घातली. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीची ही लढाई विचारधारेची आहे, एकीकडे महायुती दुसरीकडे महाविकास आघाडी आहे. आपला देश संविधानाने चालला पाहिजे. मात्र आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानाला केवळ हे एक पुस्तक आहे असे म्हणतात. पण संविधान हे देशाचा डीएनए आहे. यामध्ये सर्व महापुरुषांचे विचार आणि इतिहास कालीन विचार आहे. प्रधानमंत्री आणि त्यांची टीम लपून संविधानाची हत्या करतात. संविधानावर भाजप आक्रमण करत आहेत ज्या बैठकीत अमित शहा, अदाणी बसले होते ती बैठक सरकार चोरी करण्याची होती. संविधानात कुठे लिहिलं करोड रुपये देऊन आमदार खासदार यांना खरेदी करायचं? भाजपचे लोकं मोदी, शाह ही धारावी गरीबांची जमीन त्यांचे मित्र गौतम अदाणी यांना देणार होते म्हणून सरकार चोरी केलं. महाराष्ट्रातील सरकार चोरी केलं. धारावी जमीन गौतम अदाणी यांना देण्यासाठी आमदार खरेदी केले गेले,” असा घणाघात राहुल गांधी यांनी आपल्या प्रचारसभेमध्ये केला. तसेच पक्षफोडीच्या राजकारणावरुन जोरदार निशाणा साधला.
संविधान बदलण्याची घोषणा भाजपला पडणार भारी? निवडणूक आयोगाकडे कॉंग्रेस नेत्यांची तक्रार
मोदींची मेमरी लॉस
राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा गाजलेला आहे. तसेच देशामध्ये जातीनिहाय जनगणना करण्याची कॉंग्रेसची मागणी आहे. यावरुन मोदी सरकारवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, “मोदी म्हणतात, राहुल गांधी आरक्षण विरोधी आहे, मोदीची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांना आता स्मृतीभ्रंश झाला आहे. मोदींची मेमरी लॉस झाली आहे. त्यांचं वागणं बघून अमेरिकेच्या माजी अध्यक्षांची आठवण येते. तेही अनेकदा गोष्टी विसरायचे, त्यांच्या बाजुला असलेल्या व्यक्तीला त्यांना आठवण करून द्यावी लागत होती. आम्ही जातीय जन गणना करण्याची विनंती केली. ही लढाई संविधानाची आहे,” असा घणाघात राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचारसभेमध्ये केला आहे.
उमेदवार राकेश मुथा यांचे फाडले बॅनर, उमेदवाराचा रस्त्यावरच ठिय्या