Devendra Fadnavis filed his candidature in Nagpur
नागपूर : विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. तेव्हापासून राज्याचे राजकारण रंगले असून विविध घडामोडी घडत आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे 20 ऑक्टोबरपासून उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जात आहेत. काल (दि.24) गुरुपुष्यामृत योग साधून अनेक बड्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आता आज भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नागपूरमध्ये भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला दबदबा दाखवून दिला आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे आज नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्या घरामध्ये त्यांचे कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आले. अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांचे औक्षण करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर घरातील इतर सदस्यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महायुतीचे पुन्हा एकदा सरकार यावे यांसाठी शंखनाद केला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांची यंदाची ही सहावी विधानसभा निवडणूक आहे. त्यासाठी घरातून आणि हजारो कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
#Maharashtra #SouthWestNagpur pic.twitter.com/vMqGZkGjd5
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 25, 2024
हे देखील वाचा : झिशान सिद्दिकींचे वडिलांच्या पावलावर पाऊल! आता ठाकरेंना देणार थेट टक्कर
देवेंद्र फडणवीस यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी राज्यातील भाजपचे महत्त्वपूर्ण नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. गडकरींच्या निवासस्थानी जाऊन फडणवीसांनी आशिर्वाद घेतले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासह दक्षिणमधून मोहन मते आणि नागपूर पूर्वीमधून कृष्णा खोपडे असे तीन नेते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे.
United Nagpur loves #Devabhau !@Dev_Fadnavis#Maharashtra #SouthWestNagpur pic.twitter.com/XUqhBOVa1s
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) October 25, 2024
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. फडणवीस म्हणाले की, जनतेचा आणि आईचा आशिर्वाद माझ्या पाठीशी आहे. मागच्या सगळ्या निवडणुकांमध्ये चांगला विजय मिळाला, तसाच आता सहावा विजय देखील मोठा मिळेल. खूप चांगल्या मतांनी मी निवडणून येईल, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. देवेंद्र फडणवीस यांची नागपूरच्या संविधान चौकातून रॅलीला सुरुवात झाली आहे. जोरदार शक्तीप्रदर्शन, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि घोषणाबाजी दिसून येत आहे. फडणवीस यांना आशिर्वाद देण्यासाठी उत्तराखंडहून नागा साधू देखील आले आहेत.