Great enthusiasm of voters in Vadgaon Maval 34.17 percent polling till 1 pm in the taluk
वडगाव मावळ : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे. विधानसभा निवडणुकीतील 288 मतदारसंघासाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदारांच्या मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत. प्रशासनाकडून देखील मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. वडगाव मावळमध्ये देखील मतदारांचा मतदानासाठी मोठा प्रतिसाद दिसून येत आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघात आज सकाळी सात वाजता मतदानास प्रारंभ झाला. सकाळी 11 वाजेपर्यंत तालुक्यात 17.92 टक्के मतदान झाले तर सकाळी 9 वाजेपर्यंत तालुक्यात 6.07 टक्के मतदान झाले तर दुपारी 1 वाजेपर्यंत 34.17 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. वडगाव शहरातील अनेक मतदान केंद्रात तर सकाळपासूनच रांगाच रांगा लागल्या आहेत. मतदार मोठ्या संख्येने मतदानाला उतरल्याने मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
दुपारी १ वाजेपर्यंत झालेले मतदान
सकाळी १ वाजेपर्यंत ३८६१७२ पैकी १३१९५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणाऱ्यांमध्ये ७१३१९ पुरुष व ६०६३७ हजार महिलांचा समावेश आहे, अशी माहिती मावळ विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली. मतदार मोठ्या संख्येने मतदानाला उतरल्याने मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तर, आज संध्याकाळी उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार असून येत्या 23 तारखेला त्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मावळात ४०२ मतदान केंद्रे, अडीच हजार कर्मचारी
मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण ४०२ मतदान केंद्र हे. त्यात एक संवेदनशील मतदान केंद्र आहे. एकूण मतदार हे ३ लाख ८६ हजार १७२ आहेत. तसेच सर्व्हिस वोटर १२९ आहेत. त्यामध्ये १ लाख ९७ हजार ४३६ पुरुष असून १ लाख ८८ हजार ७२३ स्त्रिया आहेत.प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्र अध्यक्ष आणि तीन सहकारी असतील, ज्या मतदान केंद्रावर १२०० पेक्षा जास्त मतदार आहेत. तिथे एक अतिरिक्त अध्यक्ष असेल. एकूण मावळ मतदार संघात २५०० कर्मचारी मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कार्यरत असल्याचे सुरेंद्र नवले यांनी सांगितले. कोणत्याही मतदान केंद्रावर उमेदवार, उमेदवाराचे प्रतिनिधी तसेच मतदारांना मोबाईल फोन घेऊन जाण्यास व वापरण्यास निवडणूक आयोगाने प्रतिबंध केलेला आहे.