फोटो - सोशल मीडिया
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदान केंद्रांबाहेर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील परिवारासह मतदानाचा हक्क बजावला आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज हे माहिम मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. मतदान केल्यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्यासह संपूर्ण परिवाराने मतदान केले. यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनसेचे सर्व उमेदवार हे मला अमित एवढेच महत्त्वाचे आहेत, असा उल्लेख राज ठाकरे यांनी केला. तसेच अमित ठाकरेंना मतदान करून कसं वाटलं? असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, मी आजवर अनेकवेळा मतदान केले आहे. आजही मतदान केलं. मतदान करून नेहमीच चांगलं वाटतं असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
त्याचबरोबर वरळीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला मनसेने पाठिंबा दिला असल्याचे पत्र व्हायरल होत आहे. या व्हायरल पत्रामध्ये मनसैनिकांच्या आणि समर्थकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यावर राज ठाकरे यांनी मत मांडले आहे. राज ठाकरे म्हणाले की, “वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये व्हायरल झालेले पत्र खोटे आहे. आम्ही कोणत्याही गटाला पाठिंबा दिलेला नाही. आम्ही आमच्या निवडणूका लढवत आहोत. वरळीचा मतदार सुज्ञ आहे. ते योग्य तो निर्णय घेतील,” असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक प्रकार उघडकीस येत आहे. नेत्यांवर हल्ले होत आहे. उमेदवारांवर देखील हल्ले केले जात असून जीवघेणा प्रकार सुरु आहे. त्याचबरोबर पैसे वाटपाचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. राष्ट्रीय नेते असलेल्या विनोद तावडे यांच्या प्रकरणावरुन तर सर्वांचे डोळे पांढरे झाले आहेत. यावर देखील राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले की, “मी मागेच मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सांगितले होते. आजपर्यंत निवडणुकांमध्ये जे पाहायला मिळाले नाही, ते या निवडणुकीत पाहायला मिळेल. आता राज्यात तसेच होताना दिसत आहे,” असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.