Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मी पवारसाहेबांना सोडलेलं नाही, तर…; प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अजित पवारांचे सूचक विधान

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी बारामतीमध्ये गावागावांमध्ये भेटीगाठी दिल्या आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या रिटायरमेंटचा उल्लेख केला.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 17, 2024 | 01:41 PM
Maharashtra Election 2024 Ajit Pawar again spoke about Sharad Pawar's retirement

Maharashtra Election 2024 Ajit Pawar again spoke about Sharad Pawar's retirement

Follow Us
Follow Us:

बारामती : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकारण रंगले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे प्रचारचे शेवटचे दिवस राहिले असल्यामुळे जोरदार प्रचार सुरु आहे. बंडखोरीच्या राजकारणानंतर राज्यातील ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे सर्व राजकीय पक्षांचे भविष्य ठरवणारी तसेच राज्याचे राजकारणाची दिशा ठरवणारी आहे. त्यापूर्वी आता अजित पवार यांनी सूचक विधान केले आहे. तसेच अजित पवार यांनी मतदारांना भावनिक साद देखील घातली आहे.

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये देखील बारामती मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामतीमध्ये पवार कुटुंबामध्येच लढत होणार आहे. अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार यांनी नवा उमेदवार दिला आहे. अजित पवार यांच्या विरोधात त्यांचाच पुतण्या युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता बारामतीकर दादा म्हणून कोणाला कामाची संधी देतात याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. अजित पवार यांनी बारामतीमध्ये जोरदार प्रचार, सभा व भेटीगाठी घेतल्या आहेत. आज (दि.17)  हे गावागावांमध्ये भेटी देत आहेत. अजित पवार यांनी गावभेटीवेळी मतदारांना आवाहन केले.

अमित शहांचा महाराष्ट्र दौरा रद्द, तातडीने दिल्लीकडे रवाना; मोठं कारण आलं समोर

अजित पवार म्हणाले की, “माळेगावमधील काही पुढारी चुकीचं काम करतायेत. मी तुम्हाला सांगतो तुम्हाला तसं करायचं असेल तर उघड करा. पूर्वी आमदार झालो. त्यावेळी याठिकाणी काय होतं, कुसळं यायची. आता काय परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही विचार करून मला साथ द्या. साहेबांचा आदर राखून ताईंना साथ दिली. आता मला साथ द्या, लोकांना वाटत होतं की मी शरद पवार साहेबांना मी सोडायला नको होतं. परंतु मी साहेबांना सोडलं नाही. सर्व आमदारांच्या सह्या होत्या,” असे विधान अजित पवार यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

महाराष्ट्र निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भूमिका वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे अजित पवार बारामतींकरांना म्हणाले की, “मी उद्या सभा घेणार आहे. ते पण सभा घेणार आहेत. ते त्यांचा विचार मांडतील मी माझा विचार मांडणार आहे. पुढच्या पिढीसाठी कुणाला साथ द्यायची हे ठरवा. मी न मागता सगळं करतोय. याची तुम्हाला किंमत कळत नाही. मी कॅनॉलचं पाणी आणलं नसतं, तर ऊसाचं पाचट झाली असती. विनंती करणे माझं काम आहे. मतदार म्हणून निर्णय तुमचा आहे.. पवार साहेबांनी रिटायर झाले मग बारामती कडे कोण लक्ष देऊ शकतो. लोकसभेला साहेबांला साथ दिली. आता मला साथ द्या,” असे आवाहन अजित पवार यांनी मतदारांना केले आहे.

Web Title: Maharashtra election 2024 ajit pawar again spoke about sharad pawars retirement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 01:41 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

‘अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार’; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन, जय पवारांचा मोठा दावा
1

‘अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार’; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन, जय पवारांचा मोठा दावा

Pravin Tarde : ‘पहिली भेट दादांच्या चरणी’; ‘देऊळबंद 2’ सिनेमाचे 100 कोटी पार! अजित पवारांच्या स्मृतिस्थळी केले वंदन
2

Pravin Tarde : ‘पहिली भेट दादांच्या चरणी’; ‘देऊळबंद 2’ सिनेमाचे 100 कोटी पार! अजित पवारांच्या स्मृतिस्थळी केले वंदन

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत
3

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.