Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिंदे 100 टक्के उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार…त्यांच्यात हिंमत आहे का? संजय राऊतांचा घणाघात

निकालानंतर आता महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. . यावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 05, 2024 | 02:11 PM
mp sanjay raut target mahayuti oath ceremony on azad maidan

mp sanjay raut target mahayuti oath ceremony on azad maidan

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले. महायुतीच्या बाजूने एकतर्फी निकाल लागल्यानंतर देखील सत्ता स्थापनेला विलंब होत असल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. आता निकालाच्या 12 दिवसांनंतर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. यावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

दिल्लीमध्ये संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यामुळे यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार नाहीत. ते 100 टक्के आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यांच्यात शपथ टाळण्याची हिंमत आहे का हे तपासावं लागेल. दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत या क्षणी त्यांच्यात नाही. कारण अडीच वर्षांपूर्वी ती हिंमत नव्हती म्हणून त्यांनी पक्ष सोडला. आज तिघांनी शपथ घेतली, तर उरलेलं मंत्रीमंडळ स्थापन करण्यासाठी त्यांना बराच वेळ मिळतो. त्यांना मंत्रीमंडळात राहावंच लागेल. सत्तेशिवाय काही माणसं राहू शकत नाहीत”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या राजकीय भविष्याबाबत देखील वक्तव्य केले. अजित पवार हे केंद्रामध्ये राजकारण करतील असे भविष्यवाणी संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत म्हणाले की, “अजित पवारांचं राजकारण वेगळं आहे. त्यांनी दिल्लीशी चांगल्या प्रकारे जुळवून घेतलं आहे अशी माझी पक्की माहिती आहे. त्यांच्यावर विशिष्ट अशा जबाबदाऱ्या टाकल्या आहेत, तेही मला माहिती आहे, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे अजित पवार हे दिल्लीमध्ये राजकारण करणार असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीप्रमाणे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पण यावेळी राऊतांनी त्यांना टोला देखील लगावला आहे. संजय राऊत म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा आहेत. पण राज्य लूट न होण्याची जबाबदारी तुमची असेल. मागच्या अडीच वर्षात राज्यातील संपत्तीवर दरोडे पडले ते थांबले पाहिजे,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांना आमंत्रण

महायुतीच्या शपथविधीसाठी  19 राज्यांच्या मुख्यंमत्र्यांना आणि अनेक बड्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा होणार आहे. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक पदाधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.  महायुतीचे राज्यातील सर्व  आजी-माजी आमदार, खासदारही उपस्थित राहणार आहे. अशातच महायुतीकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार  आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. पण उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले या  कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचेही सांगितले जात आहे.

 

Web Title: Mp sanjay raut target mahayuti azad maidan maharashtra cm oath ceremony live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2024 | 02:10 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra CM

संबंधित बातम्या

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील
1

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
2

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे
3

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद
4

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.