Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज ठाकरेंची सत्ताही कधी येणार नाही…; भाजपच्या मित्रपक्षाने व्यक्त केली राजकीय भविष्यवाणी

यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांचा मनसे पक्ष पूर्ण ताकदीने निवडणुकीमध्ये उतरला आहे. मात्र त्यांची सत्ता येणार नाही अशी राजकीय भविष्यवाणी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 07, 2024 | 05:34 PM
येत्या 27 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्र या! राज ठाकरेंनी दिले आदेश, काय घोषणा करणार?

येत्या 27 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्र या! राज ठाकरेंनी दिले आदेश, काय घोषणा करणार?

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. अवघ्या आठवड्याभरामध्ये प्रचार थांबणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीसह इतर पक्ष देखील जोरदार प्रचार करत आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे पक्ष देखील ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. मनसेकडून राज्यभरातील अनेक मतदारसंघामध्ये उमेदवार देण्यात आला आहे. मात्र राज्यामध्ये कधीच राज ठाकरेंची सत्ताही कधी येणार नाही अशी राजकीय भविष्यवाणी करण्यात आली आहे. भाजपच्या मित्रपक्षाने ही भविष्यवाणी केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यभरामध्ये राज ठाकरेंच्या या सभांचे नियोजन करण्यात आले आहे. नुकतीच त्यांची अमरावतीमध्ये पप्‍पू उर्फ मंगेश पाटील यांच्यासाठी देखील प्रचार सभा पार पडली. अमरावतीमध्ये त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्‍या हाती सत्‍ता दिली तर एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही, असे वक्‍तव्‍य राज ठाकरे यांनी या सभेदरम्यान केले होते. या वक्तव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) प्रमुख रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना यावरुन खडेबोल सुनावले आहेत. तसेच राज ठाकरेंच्या सत्तेबाबत भविष्यवाणी केली आहे.

हे देखील वाचा : एक देवाभाऊ एक दाढी भाऊ अन् तिसरा जॅकेट भाऊ, सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ; उद्धव ठाकरेंनी तुफान टोलेबाजी

रामदास आठवले यांनी एका वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “राज ठाकरे वारंवार अशाप्रकारचे विधान करत असतात. आमचे सरकार आले तर मशि‍दीवरील भोंगे हटविणार असे ते म्हणतात. पण मशि‍दीवरील भोंगे हटणार नाहीत आणि राज ठाकरेंची सत्ताही कधी येऊ शकत नाही. कितीही वर्ष गेले तरी राज ठाकरेंची सत्ता येऊ शकत नाही. त्यांचा एकच आमदार निवडून येतो, तोही स्वतःच्या जीवावर. मग त्यांचे सरकार कसे येणार? आणि ते कसे भोंगे हटवू शकणार?” असा सवाल रामदास आठवले यांनी उपस्थित केला आहे.

हे देखील वाचा : एकाच मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन अधिकृत उमेदवार ! पनवेलमध्ये रंगतेय अजब राजकारण

पुढे रामदास आठवले म्हणाले की, “मी दहशतवादी असलेल्या मुसलमानांचा नेहमीच विरोध केला आहे. पण देशावर, भारताच्या संविधानांवर प्रेम करणारे आणि हिंदूंशी बंधुभाव राखून राहणाऱ्या मुसलमानांचा विरोध करणे ठीक नाही. मशिदीत एक-दोन मिनिटांची अजान होत असते, त्यासाठी भोंगे हटविण्याची काय गरज आहे. भोंगे हटविण्यापेक्षा गरीबी हटवा, भ्रष्टाचार हटवा, भोंगे हटविण्यापेक्षा विषमता, जातीयता हटविली पाहीजे. केवळ 140 – 145 उमेदवार उभे करून आमदार निवडून येत नसतात. मनसेचे दोनही आमदार निवडून येणार नाहीत. पण राज ठाकरे असे विधान वारंवार करत राहिले, तर माझा पक्ष भोंगे हटविणाऱ्यांना धडा शिकवल्या राहणार नाही,” असा खोचक टोला रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

 

Web Title: Raj thackeray will not come to power is a political prediction before the assembly elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 05:34 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • raj thackeray
  • Ramdas Aathvale

संबंधित बातम्या

Sambhajinagar : “भाजपने महानगरपालिका निवडणुकीत दगा दिला”; RPI गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप
1

Sambhajinagar : “भाजपने महानगरपालिका निवडणुकीत दगा दिला”; RPI गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरेंचा पहिला उमेदवार ठरला; कुणाला मिळणार पहिली उमेदवारी?
2

BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरेंचा पहिला उमेदवार ठरला; कुणाला मिळणार पहिली उमेदवारी?

Maharashtra Politics: मुंबई महापालिकेसाठी एकत्र येताच मनसेला मोठा धक्का; ‘हा’ बडा शिलेदार फुटला
3

Maharashtra Politics: मुंबई महापालिकेसाठी एकत्र येताच मनसेला मोठा धक्का; ‘हा’ बडा शिलेदार फुटला

Maharashtra Politics: ‘युती झाली पण गळती…’; ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ
4

Maharashtra Politics: ‘युती झाली पण गळती…’; ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.