Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वैभव नाईकांचा भाजपला दे धक्का सुरूच; बांदिवडे गावामधील कट्टर राणे समर्थकांचा ठाकरे गटात प्रवेश

कुडाळ- मालवणचे आमदार वैभव नाईक हे भाजपला चांगलेच हादरे देत आहेत. या मतदारसंघातील कट्टर राणे समर्थकांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती मशाल घेतली आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 15, 2024 | 04:25 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात आमदार वैभव नाईक हे भाजपला चांगलेच हादरे देत आहेत. या मतदारसंघातील कट्टर राणे समर्थकांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती मशाल घेतली आहे.  या मतदारसंघात निलेश राणेंच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात  शीतयुद्ध रंगले आहे. माजी खासदार निलेश राणे हे प्रथम शिवसेना नंतर काँग्रेस,स्वाभिमान पक्ष, त्यानंतर भाजप आणि आता  या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी  शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे या पक्ष बदलावर त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत.

आज दि. 12 नोव्हेंबरला मालवण तालुक्यातील बांदिवडे गावातील कट्टर राणे समर्थक भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक आणि  शिवसेना नेते गौरीशंकर खोत यांच्या उपस्थितीत भाजपचे प्रमुख कार्यकर्ते ओमकार मुरकर,शंकर हडकर,संतोष चंद्रकांत मुणगेकर, अनिल चौकेकर,अमोल हळदणकर आदी प्रवेशकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. .आ.वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात त्यांचे स्वागत केले आहे.

हे देखील वाचा- “राणेंच्या कार्यकर्त्यांकडून निविदासाठी ठेकेदारांना धमक्या” ;परशुराम उपरकरांचा आरोप

भाजप पक्ष इच्छुक असताना देखील हा मतदारसंघ शिंदे गटासाठी सोडला

यावेळी बोलताना प्रवेशकर्ते म्हणाले कुडाळ-मालवण मतदारसंघात उमेदवारीसाठी भाजप पक्ष इच्छुक असताना देखील हा मतदारसंघ शिंदे गटासाठी सोडला गेल्यामुळे आपण नाराज झालो असून आ.वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन बांदिवडे गावातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते बांदिवडे गावातील विकासकामांना प्राधान्य देतील, असा विश्वास यावेळी  त्यांनी व्यक्त केला आहे.

विकासाची जबाबदारी मी आमदार म्हणून माझी 

यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की, सत्ता कोणाची असो विकासाची जबाबदारी मी आमदार म्हणून माझी आहे त्यामुळे या पुढील काळातही विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द आमदार वैभव नाईक यांनी बांदिवडे गावामधील प्रवेशकर्त्यांना दिला आहे.याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, उदय दुखंडे,समीर हडकर, छोटु पांगे,संजय राणे, आप्पा परब, पप्पू परुळेकर, शाखाप्रमुख बाबुराव गावकर मधुकर परब,आबु घागरे,माजी सरपंच संजय राणे,श्रुती गावकर आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

उद्या उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

उद्या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. सायंकाळी 4 वाजता टोपीवाला हायस्कुल मालवण येथे ही सभा आयोजित केली गेली आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय हल्लाबोल करतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. कारण सिंधुदुर्गातील कुडाळ मालवण आणि जिल्ह्यातील इतर दोन्ही मतदारसंघावर उद्धव ठाकरे यांचे विशेष लक्ष आहे.

Web Title: Rane supporters join shiv sena thackeray group in presence of mla vaibhav naik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 11:17 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • nilesh rane
  • Shivsena UBT
  • vaibhav naik

संबंधित बातम्या

‘गोरे बाईंच्या नावात ‘नि’ ऐवजी ‘ची’ असायला हवे होते’; सुषमा अंधारेंचा नीलम गोऱ्हेंना टोला
1

‘गोरे बाईंच्या नावात ‘नि’ ऐवजी ‘ची’ असायला हवे होते’; सुषमा अंधारेंचा नीलम गोऱ्हेंना टोला

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका
2

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका

शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णयही बेकायदेशीर? कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात मोठा युक्तिवाद
3

शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णयही बेकायदेशीर? कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात मोठा युक्तिवाद

शिवसेना चिन्हाच्या सुनावणीत कपिल सिब्बलांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का?
4

शिवसेना चिन्हाच्या सुनावणीत कपिल सिब्बलांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.