Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunil Raut : बाळासाहेबांचा फोटो फाडला अन् सुनील राऊत संतापले! शायना एनसींच्या अटकेची मागणी, भांडूपमध्ये जोरदार आंदोलन

Sunil Raut : बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या घटनेवरून शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी अडचणीत आल्या आहेत. भांडूपमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केले. यावेळी आमदार सुनील राऊत यांनी शायना एनसी यांच्यावर कारवाईची मागणी करत एकनाथ शिंदेंवरही टीका केली.

  • By विवेक
Updated On: Nov 19, 2026 | 09:18 PM
Sunil Raut on Shaina NC

Sunil Raut on Shaina NC

Follow Us
Follow Us:
  • शायना एनसींच्या कृतीने राज्यातील राजकारण तापले
  • भांडूपमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे जोरदार आंदोलन
  • सुनील राऊत यांनी एकनाथ शिंदे, शायना एनसींवर साधला निशाणा
 

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका फोटोवरून जोरदार वाद पेटला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या घटनेनंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. सोनिया गांधी यांच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान झाल्याचा आरोप करत शायना एनसी यांनी निषेध म्हणून पुस्तकाची पाने फाडली. याच दरम्यान त्यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे आणि मनिशंकर अय्यर यांचा फोटो फाडला गेला. मात्र, यामुळे आता नवा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. (Sunil Raut)

शायना एनसी यांच्या कृतीचा निषेध करण्यासाठी मुंबईतील भांडूपमध्ये ठाकरे गटाचे शिवसैनिक रस्त्यावर उतरले. हातात काळे आणि भगवे झेंडे, निषेधाचे पोस्टर घेत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

या आंदोलनात शायना एनसी यांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडण्याच्या प्रकारामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली. पोस्टरबाजी आणि घोषणांनी भांडूपमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले.

‘सोनिया व राहुल यांच्या फोटोला जोडे मारण्याची हिंमत उबाठाने दाखवावी…’; शिवसेना प्रवक्ते आनंद परांजपे यांची मागणी

सुनील राऊत शायना एनसींवर संतापले

या आंदोलनावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी शायना एनसी यांच्यावर जोरदार टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडतानाचा प्रकार देशाने पाहिला असून, याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी भूमिका त्यांनी घेतली. शायना एनसी यांच्याविरोधात FIR दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणीही सुनील राऊत यांनी केली.

एकनाथ शिंदेंवरही साधला निशाणा

सुनील राऊत यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकेची झोड उठवली. शिंदे यांचे बाळासाहेबांवर खरे प्रेम असते, तर त्यांनी या घटनेवर कारवाई केली असती, असा टोला त्यांनी लगावला. शिंदे शायना एनसी यांच्यावर कारवाई करणार नाहीत, असा आरोपही राऊत यांनी केला.

एका बाजूला सावरकरांच्या कथित अवमानाचा मुद्दा आणि दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा वाद, यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भांडूपमधील आंदोलनानंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून, शिंदे गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Sonia Gandhi Book Controversy : सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसने शिंदेसेनेला घेरलं! गोलवलकरांचं पुस्तक फाडणार का? थेट सवाल!

💡

Frequently Asked Questions

  • Que: शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो का फाडला?

    Ans: सोनिया गांधी यांच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान झाल्याचा आरोप करत शायना एनसी यांनी निषेध म्हणून पुस्तकाची पाने फाडली. याच दरम्यान त्यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे आणि मनिशंकर अय्यर यांचा फोटो फाडला गेला.

  • Que: सुनील राऊत यांनी शायना एनसी यांच्याबाबत काय मागणी केली?

    Ans: शायना एनसी यांच्याविरोधात FIR दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी सुनील राऊत यांनी केली.

  • Que: भांडूपमध्ये ठाकरे गटाने आंदोलन का केले?

    Ans: बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी भांडूपमध्ये आंदोलन केले.

Web Title: Shaina nc balasaheb thackeray photo torn sunil raut eknath shinde controversy vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 09:18 PM

Topics:  

  • Balasaheb Thackeray
  • Eknath Shinde
  • shivsena
  • Shivsena UBT
  • sunil raut

संबंधित बातम्या

Sushma Andhare : ‘शिंदेंसाठी बाळासाहेब ठाकरे फक्त पॉलिटिकल कार्ड’; सुषमा अंधारेंचा शिंदे गटावर घणाघात
1

Sushma Andhare : ‘शिंदेंसाठी बाळासाहेब ठाकरे फक्त पॉलिटिकल कार्ड’; सुषमा अंधारेंचा शिंदे गटावर घणाघात

Shiv Sena UBT Protest: बाळासाहेबांचा फोटो फाडल्याने धुळ्यात शिवसेना आक्रमक!
2

Shiv Sena UBT Protest: बाळासाहेबांचा फोटो फाडल्याने धुळ्यात शिवसेना आक्रमक!

Sonia Gandhi Book Controversy : सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसने शिंदेसेनेला घेरलं! गोलवलकरांचं  पुस्तक फाडणार का? थेट सवाल!
3

Sonia Gandhi Book Controversy : सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसने शिंदेसेनेला घेरलं! गोलवलकरांचं पुस्तक फाडणार का? थेट सवाल!

Eknath Shinde Helicopter: एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे एक इंजिन सुरू, दुसरे इंजिन..; ऐनवेळी उड्डाण रद्द, पुण्याला कारने रवाना
4

Eknath Shinde Helicopter: एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे एक इंजिन सुरू, दुसरे इंजिन..; ऐनवेळी उड्डाण रद्द, पुण्याला कारने रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.