Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काकांचंं दर्शन घे…ढाण्या थोडक्यात वाचलास…; रोहित अन् अजित पवारांची खास भेट

अजित पवार व रोहित पवार यांनी निवडणुकीच्या निकालानंतर प्रीतीसंगमावर भेट झाली आहे. या भेटीवेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्य संवादाची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 25, 2024 | 12:56 PM
ajit pawar and rohit pawar meet in karad

ajit pawar and rohit pawar meet in karad

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची धामधुम आता संपली आहे. लवकरच महायुतीकडून सत्ता स्थापन केली जाणार असून मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. आज (दि.25) रोहित पवार व अजित पवार यांची निवडणूक नंतर भेट झाली आहे. या भेटीवेळी काकाने पुतण्याला दिलेला सल्ला आणि टोला याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा होत आहे.

आपल्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री व सुसंस्कृत राजकारणाची मुहूर्तमेढ रोवणारे यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतिदिन आहे. या निमित्ताने त्यांचे आशिर्वाद व स्मरण करण्यासाठी  नेतेमंडळी कराडमधील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळ असलेल्या प्रीतीसंगमावर येत आहेत. अजित पवारही आपल्या नेत्यांसह प्रीतीसंगमावर पोहोचले होते. त्यावेळी शरद गटाचे आमदार रोहित पवार समोरासमोर आले. अजित पवार आणि रोहित पवार यांची ही प्रीतीसंगमावरील भेट आणि संवाद राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. अजित पवार यांनी आपल्या खास शैलीमध्ये रोहित पवार यांना सल्ला देत कर्जत जामखेडच्या निकालावर भाष्य केले. तसेच रोहित पवार यांना खाली वाकून नमस्कार करायला लावला.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

नेमकं झालं काय?

प्रीतीसंगमावर रोहित पवार व अजित पवार यांची अचानक भेट झाली. यावेळी अजित पवार यांनी रोहित पवार यांना उद्देशून सांगितले की, ये ये..दर्शन घे काकांचं, असे अजित पवार रोहित पवार यांना म्हणाले. रोहित पवार यांनी देखील काकांना खाली वाकून नमस्कार केला. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर अजित पवार यांनी रोहित पवार यांना म्हणाले की, थोडक्यात वाचला ढाण्या… माझी सभा झाली असती तर काय झालं असतं…असे अजित पवार म्हणाले. यानंतर हसून दोघेही नेते गेले. मात्र या खास भेटीची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार म्हणाले की, ते माझे काका आहेत म्हणून पाया पडलो. आतातरी विचारांमध्ये भिन्नता आहे, शेवटी संस्कृतीप्रमाणे वडीलधारी व्यक्तीच्या पाया पडणं माझी जबाबदारी आहे. 2019 च्या निवडणुकीला त्यांनी मला खूप मदत केली होती. चव्हाण साहेबांच्या स्मृतिठिकाणावर भेदभाव करून चालत नाही. संस्कृती पाळणं महत्त्वाचं आहे तेच आम्ही केलं आहे. सभा झाली असती तर काही प्रमाणात वर-खाली झालं असतं. उलटंही होऊ शकलं असतं. मात्र ते बारामतीमध्ये अडकून पडले होते. शेवटी ते मोठे नेते होते आणि निर्णय त्यांचा होता. पक्षाचे आमदार निवडून आले चांगली गोष्ट आहे, आम्ही त्याचं अभिनंदन केलं, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीचा धक्कादायक निकाल हाती आला. यंदाच्या निवडणुकीमध्ये चुरशीची लढत होईल असे वाटत होते. मात्र लाडक्या बहिणींच्या आशिर्वादाने महायुतीला एकतर्फी भन्य विजय मिळाला आहे. महाविकास आघाडीचा अनपेक्षित असा पराभव झाला आहे. भाजपला यामध्ये 132, शिंदे गटाला 57 तर अजित पवार यांच्या पक्षाला 41 जागा मिळाल्या आहेत. रोहित पवार आणि भाजप नेते राम शिंदे यांच्यामध्ये कर्जत जामखेडमध्ये एकदम चुरशीची लढत झाली. पिछाडीवर असलेले रोहित पवार यांचा केवळ 1243 मतांनी विजय झाला आहे. यावरुन अजित पवार यांनी रोहित पवार यांना टोला लगावला आहे.

Web Title: Rohit pawar and ajit pawar meet in pritisangam karad elections 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 12:56 PM

Topics:  

  • ajit pawar
  • MLA Rohit Pawar

संबंधित बातम्या

आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? ‘या’ बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं
1

आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? ‘या’ बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

Ambegaon Election : आंबेगाव तालुक्यात महायुती फिस्कटली? ‘हे’ पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार
2

Ambegaon Election : आंबेगाव तालुक्यात महायुती फिस्कटली? ‘हे’ पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार

NCP Star Campaigner List: राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, अमोल मिटकरींना दिली नवीन जबाबदारी
3

NCP Star Campaigner List: राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, अमोल मिटकरींना दिली नवीन जबाबदारी

माळशिरस तालुक्याच्या राजकारणात पुन्हा उलथा पालथ! अजित पवार अन् धवल मोहिते पाटलांची भेट
4

माळशिरस तालुक्याच्या राजकारणात पुन्हा उलथा पालथ! अजित पवार अन् धवल मोहिते पाटलांची भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.