Photo Credit- Social Media
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार यांच्या विरूद्ध भाजपचे उमेदवार राम शिंदे अशी लढत झाली. अटीतटीच्या या लढतीत रोहित पवार विजयी झाले. पण या निर्णयावर आता राम शिंदे यांनी संशय व्यक्त केला आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार स्मृतीस्थळावर दाखल झाले होते. त्याचवेळी नवनिर्वाचित आमदार रोहित पवार हेदेखील याठिकाणी उपस्थित होते. यावेळी रोहित पवार आणि अजित पवार आमने-सामने आले असता रोहित पवारांनी अजित पवारांना पाहताच त्यांना नमस्कार केला. त्यावर अजित पवार म्हणाले, दर्शन घे दर्शन. काकाचं. दादांच्या बोलण्यानंतर रोहित पवारांनी अजित पवारांना वाकून नमस्कार केला. अजित पवार म्हणाले, ‘अरे ढाण्या थोडक्यात वाचलास… माझी सभा झाली असती तर, काय झालं असतं. बेस्ट ऑफ लक. ” असा संवाद झाल्यानंतर दोघेही निघून गेले.
या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार म्हणाले की, ते माझे काका आहेत म्हणून पाया पडलो. आतातरी विचारांमध्ये भिन्नता आहे, शेवटी संस्कृतीप्रमाणे वडीलधारी व्यक्तीच्या पाया पडणं माझी जबाबदारी आहे. 2019 च्या निवडणुकीला त्यांनी मला खूप मदत केली होती. चव्हाण साहेबांच्या स्मृतिठिकाणावर भेदभाव करून चालत नाही. संस्कृती पाळणं महत्त्वाचं आहे तेच आम्ही केलं आहे. सभा झाली असती तर काही प्रमाणात वर-खाली झालं असतं. उलटंही होऊ शकलं असतं. मात्र ते बारामतीमध्ये अडकून पडले होते. शेवटी ते मोठे नेते होते आणि निर्णय त्यांचा होता. पक्षाचे आमदार निवडून आले चांगली गोष्ट आहे, आम्ही त्याचं अभिनंदन केलं, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.
या संवादानंतर राम शिंदे यांनी, आपल्याविरोधात कट झाल्याचा आरोप केला आहे. अजित पवार रोहित पवारांना म्हणाले मी सभा घेतली असती तर तुझं काय झालं असतं. हा नियोजित कट होता. अजित पवार हेदेखील या त त्यात माझा बळी गेला. रोहित पवार या राज्याचे भावी मंत्री समजतात, त्यांनी या निवडणुकीत स्वत:चा आणि कुटुंबाचा मतदानाचा हक्क बजावला नाही. एकूणच या सगळ्या राजकीय सारीपाठात जे झालं त्याचा मी बळी ठरलो आहे. असं म्हणत त्यांनी अजित पवार हेदेखील या कटात सहभागी होते असा अप्रत्यक्ष आरोप केला.
निकालाच्या दिवशी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवात झाल्यानंतर पोस्टल मतांपासून रोहित पवारांनी आघाडी घेतली होती. हळूहळू दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत सुरू झाली, कधी रोहीत पवार आघाडीवर तर कधी राम शिंदे सायंकाळपर्यंत दोघांमध्येही आघाडी पिछाडी सुरू होती. सायंकाळी पाच-साडेपाचनंतर चित्र स्पष्ट होऊ लागलं. कर्जत-जामखेडमध्ये 2,60,380 एवढं मतदान झालं होतं. तर एकूण मतदानाची टक्केवारी 74.94 इतकी होती. अखेर या चुरशीच्या लढतीत रोहीत पवारांनी बाजी मारत विजय मिळवला.