MP Sanjay Raut accused the Mahayuti of distributing money during the assembly elections
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्राबाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. झारखंड व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यंदाची निवड़णूक ही राजकीय पक्षासाठी महत्त्वाची असून प्रतिष्ठेची आहे. मतदानानंतर खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. संजय राऊत यांनी पैसे वाटपावरुन भाजपवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
मतदानाच्या दिवशी माध्यामांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी मतदारांना आवाहन केले आहे. संजय राऊत म्हणाले की, “संयुक्त महाराष्ट्राच्या काळाची निवडणूक झाली आहे. ती निवडणूक झाली ते महाराष्ट्र टिकविण्यासाठी झाली होती. आता यंदाची विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचे हक्क शाबूत ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे. त्या निवडणुकीत महाराष्ट्राचा विजय झाला. या निवडणुकीत महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांचं ध्रुवीकरण सुरू आहे. ही निवडणूक महाराष्ट्राचा स्वाभिमान व अभिमान या संदर्भात अत्यंत महत्त्वाची आहे. व्यापार मंडळाचे महाराष्ट्रात अतिक्रमण आक्रमण झालेला आहे. आम्ही त्या विरोधातील आहे. आता कधी नव्हे इतका पैशाचा पाऊस पडत आहे. आपल्या राज्यात मतांसाठी आता ठिकठिकाणी फक्त पैसे पैसे मिळत आहेत,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, “यावेळी जितका पैशांचा वापर झाला तितका कधी झाला नसेल. या राज्याला संस्कृती आहे विचार आहेत ते मोडून लोक काम करत आहेत ती मोडून मतदान करावं. आम्ही प्रचाराला जाताना आमच्या भागात तपासलं जातं, पण काल पैसे सापडून देखील गुन्हा दाखल झाला नाही. स्थानिक आमदार आणि कार्यकर्त्यांनी पैसे पकडले असे चित्र समोर आलं. किरकोळ गुन्हे दाखल केले हे महाराष्ट्रातील जनतेने विसरू नये. जे चित्र महाराष्ट्राने देशाने पाहिलं ते म्हणणं खरं की ज्याच्यावर आरोप आहेत त्याचा म्हणणं खरं आहे. जर असं असेल तर महाराष्ट्रातील संशयित आरोपींना मुक्त करा. विनोद तावडे इतका कसलेला खेळाडू असा काही चूक करेल असं वाटत नाही. सरकारमधल्याच काही लोकांनी हितेंद्र ठाकूर यांना माहिती दिली. आमची माहिती आहे पंधरा कोटी घेऊन आले होते पण नऊ लाख कसे दाखविले. महाराष्ट्र लोटला कसा जातोय याचे हे उत्तम उदाहरण आहे,” असा घणाघात संजय राऊत यांनी केल आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
खासदार संजय राऊत म्हणाले की, “भाजप आणि मिंधे गटाचे लोकांना वेगळा न्याय आहे. राम रेपाळेंच्या गाड्या पैसे असतात चार गाड्या असतात आणि पैसे वाटून तो सही सरांना परत ठाण्यात जातो. त्यांच्या गाड्या तपासल्या जात नाहीत. हा राज्याला धोक्याकडे नेणारा प्रश्न आहे. काही ठिकाणी मताला 5000 रुपये लावलेले आहेत. नारायण राणेंच्या लोकसभा निवडणुकीत मताला दहा हजार रुपये लावले गेले. हे कुठ आहे लोकशाही हा लोकशाहीचा उत्सव आहे का आहे लोकशाहीचे विटंबना आहे. आम्ही निष्ठा विकल्या नाहीत त्याचे पोट दुखी त्यांना आहे तुम्ही किती वेळा जरी आलात तरी आमची लिस्ट उचलणार नाही,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.