“मुलांना मोफत शिक्षण, जीवनावश्यक वस्तूंचं दर...", ठाकरेंच्या शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध (फोटो सौजन्य-X)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज (7 नोव्हेंबर) वचननामा प्रसिद्ध केला. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करण्याची अनेक जाहीर आश्वासने दिली आहेत. महाविकास आघाडीचा एकत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला जात आहे.महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यासोबत सहमत आहोत. मात्र शिवसेनेचीही काही वचने आहेत. ती सरकार आल्यानंतर पूर्ण केली जातील, असे उद्धव ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द केला जाईल. कोळीवाडीची ओळख पुसू देणार नाहा. कोळीवाड्यांचा क्लस्टरचा जीआर रद्द करू, राज्यातील बेरोजगारी दूर करू, भूमिपुत्रांना नोकरी देऊ, मुलांना मोफत शिक्षण देऊ, जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू, आदी आश्वासने उद्धव ठाकरेंनी दिली आहेत.
1. राज्यातील विद्यार्थिंनीना शासनाकडून मोफत शिक्षण दिले जाते. परंतु, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर राज्यातील मुलांनाही मोफत शिक्षण दिले जाईल. मुलगा आणि मुलगी हे दोन्ही कुटुंबाचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे मुलांना मोफत शिक्षण मिळणे गरजेचे आहे
2. महिलांना अनेकदा पोलीस ठाण्यात तक्रार कुठे करावी हेच कळत नाही. याच पार्श्वभूमीवर राज्यात मविआची सत्ता आल्यास महिला पोलिसांची भरती होणार आहे. वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांसह महिला अधिकार असलेले पोलीस ठाणे सुरु करण्यात येईल.
हे सुद्धा वाचा: राहुल गांधींच्या अडचणी वाढ! CBI कडून नागरिकत्वाविषयी चौकशी सुरू, दिल्ली हायकोर्टाने दिली माहिती
3. मुंबईतील अदानी प्रकल्प रद्द करुन त्याठिकाणी धारावीकरांना उद्योगधंजद्यासकट घरे देऊ. ग्रामीण भागातील लोक मुंबईला यावे. मुंबई तुमची आहे, मराठी माणसाची आहे, भविष्यात शासनाच्या प्रभावाखाली धारावी आणि मुंबई परिसरातील महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना दरात घर देऊ.
4. राज्यातील शेतकऱ्यांना मविआची सत्ता आल्यास हमीभाव दिला जाईल.
5. आता पुन्हा आमची सत्ता आली की महाराष्ट्रात पुढील पाच वर्षे जीवनावश्यक वस्तूंच्या दरात कोणतेही बदल होणार नाही. डाळ, तांदूळ, साखर, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव आमचे सरकार स्थिर ठेवेल आहे. त्या सोबतच माविआच्या कालच्या सभेत जाहीर केलेल्या पंचसूत्र, त्रीचाही वचननाम्यात समावेश असणार आहे.
तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, “शिवसेनेच्या वतीने महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही काय करणार, आम्ही जनतेची सेवा कशी करू, याचे आश्वासन मी जनतेसमोर ठेवले आहे. जनता…होय…आम्ही जे बोलतो तेच करतो. आम्ही अनेक आश्वासने पूर्ण केली आहेत आणि आजही जनतेचा आशीर्वाद मिळाल्यावर आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करू.
प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मठ, देऊळ आणि प्रेरणादायी मंदिर उभारू…
गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर या जीवनावश्यक वस्तूंचे भाव दोन वर्षे स्थिर ठेऊ.
अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका यांच्या वेतनात वाढ करू.
प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देऊ.
जात-पात-धर्म-पंथ न पाहता, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मुक्कामांगे मोफत शिक्षण देऊ.
सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करू.
विक्रमी ५० हजार कोटींचे पॅकेज देऊन पिकाला हमीभाव देऊ.
वंचित समूहाला सक्षम आणि स्वावलंबी बनवू.
स्थानिकांना त्याच्या उद्योगात सर्वोच्च रहावे तर तशा निती ठेऊ. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य देऊ. तसेच अधिकचे औद्योगिक केंद्र उभारू.
बाह्य देशांना विनाकारण प्रवेश न देणारे. गिरणी कामगार संरक्षणासह मिलर्सच्या जवळच पर्यावरणासहित उद्योगाच्या साधनांना पर्यावरणासहित योग्य निर्णय घेऊ.
हे सुद्धा वाचा: ऐन निवडणुकीत बेरोजगार तरुणांच्या नावावर 10 ते 15 कोटींची रक्कम जमा, नेमकं काय प्रकरण?