Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मतदानाच्या एकदिवस आधीच विरारमध्ये जोरदार राडा; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकूण 4,136 उमेदवार रिंगणात आहेत, जे 2019 च्या तुलनेत 27.7 टक्के जास्त आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 19, 2024 | 01:35 PM
मतदानाच्या एकदिवस आधीच विरारमध्ये जोरदार राडा; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप

मतदानाच्या एकदिवस आधीच विरारमध्ये जोरदार राडा; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप

Follow Us
Close
Follow Us:

विरार : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा सोमवारी (दि.18) संध्याकाळी सहा वाजता थंडावल्या. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यातील 288 विधानसभेच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. तत्पूर्वी विरारमध्ये जोरदार राडा पाहिला मिळाला. या ठिकाणी भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला.

संबंधित बातम्या : प्रचारतोफा थंडावताच नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात जोरदार राडा; समर्थक भिडले आमनेसामने

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकूण 4,136 उमेदवार रिंगणात आहेत, जे 2019 च्या तुलनेत 27.7 टक्के जास्त आहेत. यामध्ये 2,086 अपक्ष उमेदवार आहेत. 2019 मध्ये एकूण 3,239 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 5 ते 13 नोव्हेंबर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांसारख्या दिग्गज नेतेमंडळींच्या प्रचारसभा झाल्या.

दरम्यान, प्रचारसभा संपल्या असल्या तरीही आता छुप्या पद्धतीने प्रचार केला जाणार असल्याचे म्हटले जात होते. त्यातच विरारमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहिला मिळाले. या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांकडून करण्यात आला. आता विरोधी बहुजन विकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे.

विरारमध्ये भाजप विरूद्ध बहुजन विकास आघाडीत लढत

विरारमध्ये सध्या भाजप विरूद्ध बहुजन विकास आघाडीत लढत पाहिला मिळत आहे. या ठिकाणी भाजपकडून राजन नाईक हे निवडणूक लढवत आहेत. तर हितेंद्र ठाकूर हे बहुजन विकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याच मतदारसंघात तावडेंकडून पैसे वाटण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

जाऊ द्या, मला माफ करा…

दरम्यान, पैसे वाटल्याचे दिसत असल्याने बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी तावडेंना रोखून धरले होते. इतकेच नाहीतर तावडेंना बाहेर पडण्यासही जोरदार विरोध केला. असे असताना ‘विनोद तावडे यांचे मला 25 फोन आले. त्यांनी जाऊ द्या, मला माफ करा’, असे म्हटल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.

विनोद तावडेंकडून आरोपांचं खंडन

विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप झाल्यानंतर वातावरण चांगलंच तापल्याचे पाहिला मिळाले. मात्र, तावडे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोपांचं खंडन केलं.

संबंधित बातम्या : आतिशी मंत्रिमंडळात गेहलोत यांच्या जागी रघुविंदर शौकीन यांना स्थान; आपचे लक्ष आता जाट नेत्यांवर…

Web Title: Vinod tawde accused of distributing money nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 01:23 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • political news
  • Vinod Tawde

संबंधित बातम्या

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा
1

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा

Shivsena Dussehra Melava : तेव्हा तुम्ही कुठल्या गोधडीत मुतत होता? शिंदे गटावर टीका करताना संजय राऊतांचा गेला तोल
2

Shivsena Dussehra Melava : तेव्हा तुम्ही कुठल्या गोधडीत मुतत होता? शिंदे गटावर टीका करताना संजय राऊतांचा गेला तोल

बिहारच्या निवडणुकीमध्येही महिलांना लक्ष्य; लाडली बहेन योजनेेतर्गत मिळणार 10 हजार रुपये
3

बिहारच्या निवडणुकीमध्येही महिलांना लक्ष्य; लाडली बहेन योजनेेतर्गत मिळणार 10 हजार रुपये

Shivtirtha Dussehra Melava : दसरा मेळाव्यामध्ये राज-उद्धवच्या युतीची घोषणा होणार? खासदार संजय राऊतांचे सूचक विधान
4

Shivtirtha Dussehra Melava : दसरा मेळाव्यामध्ये राज-उद्धवच्या युतीची घोषणा होणार? खासदार संजय राऊतांचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.