
'सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर...'; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
नारायणगाव (ता. जुन्नर) येथे पत्रकारांशी बोलताना खासदार राऊत यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडेतोड टीका केली. राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षाची शिष्टमंडळ जाणार या पार्श्वभूमीवर, राहुल गांधी यांचा उद्धव साहेबांना फोन आला होता का, यावर चर्चा झाली का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, काँग्रेसची एकला चलोची भूमिका बिल्कुल नाही. सर्वांना, सर्व पक्षांना घेऊन पुढे जाण्याची त्यांची तयारी आहे. म्हणून आम्ही आंदोलनात सहभागी झालो. मुंबईमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या मोर्चाला काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष देखील उपस्थित होते.
प्रत्येक पक्षाच्या राज्यातील काही अडचणी आहेत, त्यामुळे त्या हळूहळू दूर झाल्या तर आम्ही सुद्धा दिल्लीमध्ये जाऊन मुक्काम करणार व सरकारविरुद्ध शड्डू ठोकणार आहे. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनात राज ठाकरे सहभागी झाले. त्यानंतर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची भेट झाली यावर राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री आणि राजसाहेबांचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. कदाचित मुख्यमंत्री त्यांच्या मंत्र्यांचा ऐकणार नाही पण राज ठाकरे यांचं निश्चित ऐकतील.
दिल्ली सरकारने जाहीर केला ड्राय डे
निवडणूक आयोग व एसआयआर विरोधात केंद्रात आंदोलन सुरू होतं, त्यावेळी दिल्ली सरकारने ड्रायडे जाहीर केला. या प्रश्नावर खासदार राऊत यांनी दिल्ली पोलीस दारू पिऊन कारवाई करतील की काय म्हणून सरकारने ड्राय डे जाहीर केला, अशी मिश्किल टिप्पणी केली. ज्या-ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, त्या ठिकाणी ड्राय डे जाहीर करणं हा एक नवीन पायंडा सरकार पाडू पाहत आहे. संपूर्ण देशात ११३० ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. बिहारमध्ये दहा आंदोलन झाली. उत्तर प्रदेशमध्ये SIR च्या मुद्द्यावर तीन आंदोलन झाली.
नागपुरात बंड थोपवण्यात भाजपला अपयश; पुण्यातून चिवटेंची माघार पण अनिल सोले लढण्यावर ठाम