Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

८ ऑक्टोबर रोजी राज्य, जिल्हा आणि तालुका/मंडळ स्तरावर व्यापक आंदोलनाचे आवाहन करण्यात आले आहे. पक्षाने याला अत्यंत महत्त्वाचे म्हटले असून, सर्व संबंधित घटकांना तातडीने कारवाई सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 08, 2026 | 07:11 AM
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

Follow Us
Follow Us:
  • ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेस आक्रमक
  • विरोधी पक्षाकडून भारतीय लोकशाहीसाठी ‘काळा दिवस’ म्हणून घोषित
  • CJP चे बंगळुरूमध्ये आंदोलन
  • प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठीही आंदोलनात होणार सहभागी
नवी दिल्ली : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसकडून आज देशव्यापी आंदोलन केले जाणार आहे. विरोधी पक्षाने हा दिवस भारतीय लोकशाहीसाठी ‘काळा दिवस’ म्हणून घोषित केला आहे. राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर व्यापक आंदोलने केली जातील, असे पक्षाने म्हटले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात विरोधी खासदारांनी केलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाई आणि खासदारांच्या अटकेच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाने बुधवारी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक संदेश पोस्ट करून, राज्य काँग्रेस समित्या, जिल्हा काँग्रेस समित्या आणि तालुका काँग्रेस समित्यांना ८ ऑक्टोबर रोजी आंदोलने आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या संदेशात, ८ ऑक्टोबर रोजी राज्य, जिल्हा आणि तालुका/मंडळ स्तरावर व्यापक आंदोलनाचे आवाहन करण्यात आले आहे. पक्षाने याला अत्यंत महत्त्वाचे म्हटले असून, सर्व संबंधित घटकांना तातडीने कारवाई सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे.

CJP चे बंगळुरूमध्ये आंदोलन

बंगळूरमध्ये कॉकरोच जनता पार्टी विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करणार आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके आणि यूट्यूबर ध्रुव राठी हे देखील यात सहभागी होणार आहेत. ध्रुव राठीने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याची माहिती दिली आहे.

ज्ञानेश कुमार महाराष्ट्रात आले तर…

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेस आता चांगलीच आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत महाराष्ट्रात आल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. ‘ज्ञानेश कुमार महाराष्ट्रात आले तर काँग्रेस कार्यकर्ते त्यांना पाय ठेवू देणार नाहीत. आला तर त्याच्या तोंडाला काळं फासू,’ असा इशारा सपकाळ यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको, वांद्रे रिक्लेमेशन येथे मध्यरात्री आंदोलन

Web Title: Congress aggressive against cec gyanesh kumar to stage a nationwide protest today nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 07:02 AM

Topics:  

  • Gyanesh Kumar
  • political news
  • Priyanka Gandhi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा
1

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…
2

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…

Harshvardhan Sapkal : ‘ज्ञानेश कुमार महाराष्ट्रात आले तर तोंडाला काळं फासू’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
3

Harshvardhan Sapkal : ‘ज्ञानेश कुमार महाराष्ट्रात आले तर तोंडाला काळं फासू’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको, वांद्रे रिक्लेमेशन येथे मध्यरात्री आंदोलन
4

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको, वांद्रे रिक्लेमेशन येथे मध्यरात्री आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.