Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Actress Radha: ४६ कोटींच्या चेकवरून अभिनेत्री राधाचा मोठा आरोप; बहीण अंबिका आणि भावाविरोधात पोलिसांत तक्रार

Actress Radha: ज्येष्ठ तमिळ अभिनेत्री राधांनी बहीण अंबिका आणि भाऊ मल्लिकार्जुन यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली. सही केलेले कोरे चेक वापरून ४६ कोटी रुपये वटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 22, 2026 | 12:13 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Actress Radha:  ज्येष्ठ तमिळ अभिनेत्री राधा यांनी त्यांची बहीण आणि प्रसिद्ध अभिनेत्री अंबिका तसेच भाऊ मल्लिकार्जुन कुंजन नायर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राधा यांनी त्यांच्या सहीचे कोरे चेक त्यांच्या नकळत चेन्नईतील राहत्या घरातून काढण्यात आल्याचा आरोप केला आहे. या चेकद्वारे तब्बल ४६ कोटी रुपयांची रक्कम वटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

२१ सप्टेंबर रोजी राधांनी ग्रेटर चेन्नई पोलीस आयुक्तांकडे ही तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीत बहीण अंबिका आणि भाऊ मल्लिकार्जुन कुंजन नायर यांची नावे आहेत.

व्यावसायिक खर्चासाठी ठेवले होते सही केलेले कोरे चेक

राधांच्या टीमने दिलेल्या तक्रारीच्या प्रतीनुसार, त्यांच्या व्यावसायिक खर्चासाठी आयडीबीआय बँकेत चालू खाते आहे. प्रवासादरम्यान पगार, वीज-पाणी बिलं, कर आणि बागेची देखभाल यांसारख्या नियमित खर्चांसाठी त्यांनी काही सही केलेले कोरे चेक चेन्नईतील त्यांच्या खोलीत ठेवले होते.

हे बँक खाते सुरुवातीला ‘एआरएस गार्डन स्टुडिओ’ या नावाने चालवलं जात होतं. जानेवारी २०२५ मध्ये व्यवसायाचं नाव बदलून ‘आरआर गार्डन्स’ करण्यात आल्यानंतर राधांना नवीन चेकबुक मिळालं. त्यानंतर त्यांनी जुन्या चेकबुकचा वापर बंद केला. मात्र, जुनी चेकबुक्स घरातच असल्याचं त्या विसरून गेल्या होत्या.

पाच जुन्या चेकद्वारे ४६ कोटी रुपये वटवण्याचा प्रयत्न?

राधांच्या म्हणण्यानुसार, १७ सप्टेंबर रोजी बँकेकडून त्यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांच्या एकूण ४६ कोटी रुपयांच्या पाच जुन्या चेक्स अंबिकाच्या नावाने वटवण्यासाठी सादर करण्यात आल्याचं बँकेने सांगितलं.

ही माहिती मिळताच राधांनी तातडीने बँकेला ‘पेमेंट थांबवण्याचे’ निर्देश दिले. हे चेक आपण अंबिकाला दिले नव्हते आणि तिच्यासोबत अशा प्रकारचा कोणताही आर्थिक व्यवहार किंवा करार केलेला नसल्याचं राधांनी तक्रारीत स्पष्ट केलं आहे.

Sahal Marathi Movie: देविका दफ्तरदार यांच्या संवेदनशील अभिनयाची पुन्हा झलक पाहायला मिळणार; ‘सहल’चा पोस्टर लॉन्च

भावाने चेक भरल्याचा राधांचा आरोप

राधांचा आरोप आहे की, हे चेक त्यांचा भाऊ मल्लिकार्जुन यांनी भरले होते. अंबिका आणि मल्लिकार्जुन यांनी त्यांच्याकडून बेकायदेशीर आर्थिक फायदा मिळवण्यासाठी कट रचल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

राधांच्या दाव्यानुसार, त्या चेन्नईबाहेर असताना त्यांच्या खोलीतून हे चेक काढण्यात आले. या प्रकरणासोबतच त्यांनी कौटुंबिक मालमत्तेबाबतही काही गंभीर आरोप केले आहेत.

‘दीड वर्षांपासून मालमत्तेत प्रवेश करण्यापासून रोखलं’

राधांचा दावा आहे की, गेल्या सुमारे दीड वर्षांपासून त्यांना त्यांच्या मालमत्तेत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं आहे. या ठिकाणी त्यांचे मौल्यवान सामान, दागिने, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रं आणि इतर महत्त्वाच्या नोंदी असल्याचं त्यांनी सांगितलं.

या सर्व आरोपांची सखोल चौकशी करून आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांविरोधात कठोर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी राधांनी पोलिसांकडे केली आहे.

दरम्यान, राधांनी केलेले हे आरोप सध्या तक्रारीतील दाव्यांपुरतेच आहेत. या प्रकरणाचा कायदेशीर निकाल अद्याप झालेला नाही. पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणातील नेमकी परिस्थिती स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

Rahul Gandhi: पीएम मोदींची राहुल गांधींनी उडवली खिल्ली? ‘रामायण’ फेम सुनील लहरींनी व्यक्त केला संताप

Web Title: Actress radha ambika 46 crore cheque police complaint

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Actress

संबंधित बातम्या

Samar Khalkatkar: मॉडेलिंग ते मराठी सिनेमा! समर खळतकरची क्रांती रेडकरांच्या ‘मैत्रेया’मधून मोठ्या पडद्यावर एन्ट्री
1

Samar Khalkatkar: मॉडेलिंग ते मराठी सिनेमा! समर खळतकरची क्रांती रेडकरांच्या ‘मैत्रेया’मधून मोठ्या पडद्यावर एन्ट्री

Sourav Joshi Troll:  कंटेंटसाठी प्रायव्हसीचा विसर! गोव्यात पत्नीचा व्हिडिओ काढल्याने लोकप्रिय युट्यूबरवर टीकेची झोड
2

Sourav Joshi Troll: कंटेंटसाठी प्रायव्हसीचा विसर! गोव्यात पत्नीचा व्हिडिओ काढल्याने लोकप्रिय युट्यूबरवर टीकेची झोड

Raha Kapoor Birthday Photos: राहा कपूरचा चौथा वाढदिवस थाटात साजरा; आलिया-रणबीरच्या सेलिब्रेशनची Inside झलक
3

Raha Kapoor Birthday Photos: राहा कपूरचा चौथा वाढदिवस थाटात साजरा; आलिया-रणबीरच्या सेलिब्रेशनची Inside झलक

Sunita Ahuja Get Emotional: ‘घरातलं चैतन्य हरवलंय…’ दिवाळीच्या आधीच सुनीता आहुजा भावुक
4

Sunita Ahuja Get Emotional: ‘घरातलं चैतन्य हरवलंय…’ दिवाळीच्या आधीच सुनीता आहुजा भावुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.