Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Kiss करण्याचा प्रयत्न…’, मामानेच केला लैंगिक छळ’; टीव्ही अभिनेत्रीने सांगितला बालपणीचा धक्कादायक अनुभव`

Shivangi Joshi : 'लॉक अप 2'मध्ये टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशीने बालपणी मामाकडून झालेल्या लैंगिक छळाचा आणि अभिनयाच्या नावाखाली kiss करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक खुलासा केला.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 29, 2026 | 08:44 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • टीव्ही अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
  • मामानेच केला लैगिंक छळ
  • खुलासा करताना अभिनेत्री झाली भावूक
नेटफ्लिक्सवरील रिअॅलिटी शो ‘लॉक अप २’ सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या शोमध्ये स्पर्धक त्यांच्या आयुष्यातील अनेक धक्कादायक आणि भावनिक अनुभवांचा खुलासा करत आहेत. याच दरम्यान लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशी (Shivangi Joshi) हिने तिच्या बालपणी घडलेल्या दोन वेदनादायी घटनांचा उल्लेख करत सर्वांनाच हादरवून सोडले.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘बरसातें’ आणि ‘बडे अच्छे लगते हैं २’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या शिवांगीने सांगितले की, तिच्या वडिलांच्या व्यवसायात मोठे नुकसान झाल्याने कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले होते. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की कुटुंबाला जगण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्या काळानंतर घराची जबाबदारी तिने स्वतःच्या खांद्यावर घेतल्याचेही तिने सांगितले.

मात्र, यापेक्षाही धक्कादायक खुलासा करताना शिवांगी भावूक झाली. तिने सांगितले की, लहानपणी तिच्या आईच्या दत्तक भावाने म्हणजेच तिच्या मामाने तिचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला अभिनय शिकवण्याच्या आणि गाडी चालवण्याच्या बहाण्याने तो तिच्याशी अयोग्य वर्तन करत असल्याचे तिला जाणवले. त्यावेळी नेमके काय घडत आहे, हे लहान असल्याने तिला समजत नव्हते, असे तिने सांगितले.

Shivangi’s secrets💔
Shivangi you are so strong we are so proud of you🥺#ShivangiJoshi #Lockupp2 pic.twitter.com/mynnm9GEcL
— ᴛɪᴛʟɪ ɢɪʀʟ🦋 (@Dlittledesire) July 28, 2026

शिवांगीच्या म्हणण्यानुसार, मुंबईत अभिनयासाठी जाण्यापूर्वी तिच्या मामाने तिला ‘अभिनयात अशा गोष्टी कराव्याच लागतात’ असे सांगत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. अभिनयाच्या नावाखाली तिला जबरदस्तीने kiss करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यावेळी तिने धाडस दाखवत त्याला विरोध केला आणि त्याच्या चेहऱ्यावर मारल्याचे तिने सांगितले.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंग यांचे मराठी दिग्दर्शनात पदार्पण; सत्य घटनेवर आधारित ‘लाडू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

त्यानंतर तो संतापला आणि तिला इजा करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिचे आई-वडील घरी आले. घडलेला प्रकार समजल्यानंतर त्यांनी संबंधित नातेवाईकाला घराबाहेर काढत त्याचा जाब विचारला, असेही शिवांगीने सांगितले.

वैभव आणि पूजाची जोडी पुन्हा झळकणार! ‘भेटली तू पुन्हा’ चा सिक्वल २०२७ मध्ये येणार; चाहत्यांना आनंद आवरेना

Web Title: Actress shivangi joshi made a shocking revelation that she was sexually abused by her maternal uncle during her childhood

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 08:44 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Television Actress

संबंधित बातम्या

Shilpa Shetty Ganesh Chaturthi: शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचं आगमन; जयघोषात केलं गणरायाचं स्वागत, VIDEO व्हायरल
1

Shilpa Shetty Ganesh Chaturthi: शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचं आगमन; जयघोषात केलं गणरायाचं स्वागत, VIDEO व्हायरल

Mary Kom Statement : मैरी कॉमच्या ‘त्या’ कमेंटवरून वाद; सानिया मिर्झा-सायना नेहवालवर बोलणं पडलं महागात, टीमने मागितली माफी
2

Mary Kom Statement : मैरी कॉमच्या ‘त्या’ कमेंटवरून वाद; सानिया मिर्झा-सायना नेहवालवर बोलणं पडलं महागात, टीमने मागितली माफी

Vedika Pinto Musafir Cafe: ‘मुसाफिर कैफे’मध्ये सुधाच्या भूमिकेतून वेदिका पिंटोने जिंकली मनं; जाणून घ्या ७ खास वैशिष्ट्यं
3

Vedika Pinto Musafir Cafe: ‘मुसाफिर कैफे’मध्ये सुधाच्या भूमिकेतून वेदिका पिंटोने जिंकली मनं; जाणून घ्या ७ खास वैशिष्ट्यं

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक
4

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.