Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sun Marathi Serial: ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये शनायाच्या भूमिकेत ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री; अनुप्रियाच्या संसारात येणार मोठं वादळ

'मी संसार माझा राखिते' ही मालिका प्रेक्षकांची आवडती असून आता दोन वर्षानंतर या मालिकेत अभिनेत्री स्वाती लिमये दिसणार आहे. इतकंच नाही या मालिकेत ती नकारात्मक भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 19, 2026 | 11:49 AM
'मी संसार माझा राखिते'मध्ये दोन वर्षांनी करणार 'ही' अभिनेत्री कमबॅक (फोटो सौजन्य - इन्टाग्राम)

'मी संसार माझा राखिते'मध्ये दोन वर्षांनी करणार 'ही' अभिनेत्री कमबॅक (फोटो सौजन्य - इन्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • दोन वर्षानंतर स्वाती लिमयेची छोट्या पडद्यावर एन्ट्री
  • ‘मी संसार माझा राखिते’ मालिकेत साकारणार नकारात्मक भूमिका
  • शनाया ही भूमिका साकारण, प्रेक्षक उत्सुक 
‘सन मराठी’वरील ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मालिकेतील रंजक कथानक आणि अनपेक्षित घडामोडी यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. अनुप्रियाने दाद्दो बाबांचा खरा चेहरा सर्वांसमोर आणल्यानंतर कथानकाने एक मोठं वळण घेतलं आहे. मात्र, यानंतरही अनुप्रियाच्या आयुष्यातील संकटं संपलेली नाहीत. आता तिच्या संसारात एका नव्या व्यक्तीची एन्ट्री होणार असून त्यामुळे अनेक नवी समीकरणं तयार होणार आहेत. 

या नव्या व्यक्तीच्या एन्ट्रीमुळे अनुप्रिया आणि अविनाश यांच्या नात्यात दुरावा निर्माण होणार का? त्यांच्या संसारात गैरसमजांची नवी भिंत उभी राहणार का? की हे नवं पात्र त्यांच्या आयुष्यात आणखी काही मोठं वादळ घेऊन येणार आहे? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार असल्याची चर्चा सुरू होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या नव्या पात्राचा चेहरा समोर आला असून अभिनेत्री स्वाती लिमये ‘शनाया’ या महत्त्वाच्या आणि नकारात्मक भूमिकेत झळकणार आहे.

New Marathi Serial : थरार, रहस्य आणि भावनांची गुंफण; ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

काय म्हणाली स्वाती?

या भूमिकेबद्दल अभिनेत्री स्वाती लिमये म्हणाली की, “दोन वर्षांनंतर मी पुन्हा छोट्या पडद्यावर काम करत आहे आणि त्याचा मला खूप आनंद आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी शनायासारख्या वेगळ्या आणि दमदार भूमिकेची वाट पाहत होते. आता ही संधी मला मिळाली आहे, त्यामुळे माझं एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. खरं सांगायचं तर, ही भूमिका मिळावी असं मी मॅनिफेस्ट केलं होत आणि ती इच्छा पूर्ण झाली. याआधी मी सन मराठीवरील ‘सुंदरी’ या मालिकेत काम केलं होतं. आजही अनेक प्रेक्षक मला त्या भूमिकेमुळे ओळखतात आणि भरभरून प्रेम देतात. त्यामुळे पुन्हा एकदा सन मराठीच्या कुटुंबाचा भाग होताना खूप छान वाटत आहे.”

मालिकेत येणार मोठं वळण 

यापुढे स्वाती म्हणाली की, “‘मी संसार माझा रेखिते’ मालिकेत शनायाच्या एन्ट्रीमुळे मोठं वळण येणार आहे. एक धक्कादायक सत्य सर्वांसमोर येणार असून त्यानंतर अनेक नाती आणि परिस्थिती बदलताना दिसतील. पुढील भागांमध्ये प्रेक्षकांना बऱ्याच अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळणार आहेत. मी पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारत आहे. याआधी बहुतांश सकारात्मक भूमिका केल्या असल्यामुळे आता थोडं दडपण आलं आहे. पण नकारात्मक पात्र साकारताना ती व्यक्ती तसं का वागते, तिच्या मनात काय चाललं असतं, याचा बारकाईने विचार करावा लागतो. त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी खूप आव्हानात्मक आणि तितकंच खूप काही शिकवणारी ठरेल.शनायाचा लूकही खूप वेगळा आणि खास आहे. प्रेक्षक मला एका नव्या अंदाजात पाहणार आहेत. अभिनेत्री म्हणून अशा प्रकारचं वेगळं आणि आव्हानात्मक पात्र साकारण्याची संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. शनायामुळे अनुप्रिया आणि अविनाश यांच्या आयुष्यात नेमकं कोणतं वादळ येणार आहे, हे पाहायला प्रेक्षकांना मज्जा येईल.”

Sun Marathi New Serial: “मी संसार माझा रेखिते”च्या प्रोमोवर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हरीश दुधाडे साकारणार मुख्य भूमिका

Web Title: Actress swati limaye comeback after 2 years on television from sun marathi serial me sansar maza rakhite

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • Entertainment News
  • Marathi Serial
  • sun marathi

संबंधित बातम्या

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
1

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
2

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

Dhaktya Sunbai Serial: गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाच्या चरणी ‘धाकट्या सुनबाई’चा शुभारंभ; २८ सप्टेंबरपासून मालिका
3

Dhaktya Sunbai Serial: गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाच्या चरणी ‘धाकट्या सुनबाई’चा शुभारंभ; २८ सप्टेंबरपासून मालिका

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला
4

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.