Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित

Afratafri Movie Houn Jau De Song Release: ‘अफरातफरी’ चित्रपटातील ‘होऊन जाऊ दे’ हे नवं गाणं प्रदर्शित झालं असून, प्रणाली घोगरेच्या ग्लॅमरस अंदाजासह रंगीबेरंगी रोषणाई, मस्तीचा मूड आणि ठेका धरायला लावणारं संगीत यामुळे गाणं लक्ष वेधून घेत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 30, 2026 | 06:26 PM
Houn Jau De Song Release

Houn Jau De Song Release

Follow Us
Follow Us:
  • ‘होऊन जाऊ दे’ म्हणत थिरकायला लावणार
  • ‘अफरातफरी’चं धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
  • प्रणाली घोगरेचा अन् मुग्धा कऱ्हाडेंचा दमदार आवाज

आगामी ‘अफरातफरी’ चित्रपटातील ‘होऊन जाऊ दे’ हे नवं गाणं प्रदर्शित झालं असून, या गाण्यातून चित्रपटाचा रंगतदार अंदाज पाहायला मिळत आहे. ग्लॅमरस लूक, रंगीबेरंगी रोषणाई, मस्तीचा मूड आणि ठेका धरायला लावणारं संगीत अशा सगळ्याच गोष्टींचा मेळ या गाण्यात साधण्यात आला आहे. ‘केरळा स्टोरी’ फेम प्रणाली घोगरे हिच्या आकर्षक अंदाजामुळे गाण्याला आणखीनच रंगत आली असून, तिच्या अदांमुळे ‘होऊन जाऊ दे’ हे गाणं लक्ष वेधून घेत आहे.

OTT वर पुन्हा रंगणार माइंड गेम्स! ‘Alliance 2’ ची मोठी घोषणा; 14 जानेवारी 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला, काय असणार खास?

या गाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण गाणं ४८ फ्रेम्स प्रति सेकंद या वेगाने लिपसिंक करण्यात आलं आहे. मराठी चित्रपटात अशा पद्धतीने संपूर्ण गाण्यावर हा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला आहे. या आधी १९९२ साली ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटात आमिर खानवर चित्रित करण्यात आलेल्या ‘पहला नशा, पहला खुमार’ या गाण्यात ४८ फ्रेम्स प्रति सेकंद या वेगाने लिपसिंक करण्याचा प्रयोग करण्यात आला होता. त्यानंतरही या तंत्राचा वापर करत अनेक प्रयोग झाले, मात्र संपूर्ण गाणं ४८ फ्रेम्स प्रति सेकंद या वेगाने लिपसिंक करून चित्रित करण्याचा प्रयोग याआधी पाहायला मिळाला नाही. शूटिंगच्या दृष्टीने तसेच तांत्रिकदृष्ट्याही हा प्रयोग आव्हानात्मक होता.

गाण्यातील पत्त्यांचा खेळ, झगमगणारं वातावरण आणि कलाकारांचा बिनधास्त अंदाज यामुळे ‘होऊन जाऊ दे’ हे गाणं ‘अफरातफरी’च्या मस्तीखोर विश्वाला साजेसा एक रंगतदार संगीतसोहळा ठरत आहे. गाण्याच्या तालातली ऊर्जा आणि त्याला लाभलेला ग्लॅमरस टच यामुळे प्रेक्षकांनाही या गाण्याच्या तालावर थिरकण्याचा मोह आवरणार नाही. मुग्धा कऱ्हाडे यांच्या दमदार आवाजाने सजलेल्या या गाण्याला वरुण लिखाते यांनी संगीत दिलं आहे, तर मंदार चोळकर यांनी गीत लिहिले आहे. तर राहुल ठोंबरे यांचे नृत्य दिग्दर्शन या गाण्याला लाभले आहे.

या गाण्याबद्दल संगीत दिग्दर्शक वरूण लिखाते म्हणाले, ‘’होऊन जाऊ दे’ हे गाणं तयार करताना त्यातली मस्ती, उत्साह आणि ग्लॅमर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. गाण्याचा मूडच असा आहे की, पहिल्याच ठेक्यावर पाय थिरकायला हवेत. मुग्धा कऱ्हाडे यांच्या दमदार आवाजामुळे गाण्याला एक वेगळीच ऊर्जा मिळाली आहे. ‘अफरातफरी’च्या धमाल वातावरणाला साजेसं हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच एन्जॉय करायला लावेल.’’

दिग्दर्शक मिलिंद झुंबर कवडे म्हणतात, “‘होऊन जाऊ दे’ हे गाणं ‘अफरातफरी’च्या धमाल आणि मस्तीच्या वातावरणाला साजेसं आहे. गाण्यात ग्लॅमरसोबतच कलाकारांचा मजेशीर अंदाज पाहायला मिळतो. या गाण्यात ४८ फ्रेम्स प्रति सेकंद या वेगाने संपूर्ण गाणं लिपसिंक करण्याचा प्रयोग आम्ही केला आहे. हा प्रयोग शूटिंगच्या दृष्टीने आणि तांत्रिकदृष्ट्याही खूप आव्हानात्मक होता. गाण्याच्या प्रत्येक ठेक्याशी आणि कलाकारांच्या हालचालींशी लिपसिंक अचूक जुळवणं गरजेचं होतं. त्यामुळे या गाण्याच्या शूटिंगमध्ये खूप बारकाईने काम करावं लागलं. कलाकारांनीही ते खूप छान एन्जॉय केलं आहे. हे गाणं प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल आणि त्यांना त्याच्या तालावर थिरकायला लावेल.”

मिलिंद झुंबर कवडे दिग्दर्शित व स्कायलाईन सिनेमॅटिक आणि येन मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगाने तयार झालेला हा चित्रपट येत्या ९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मोहन आगाशे, शशांक शेंडे, संजय नार्वेकर, ओंकार भोजने, नेहा खान, प्राजक्ता हनमघर, असावरी जोशी, हेमंत पाटील आणि किरण माने यांसारख्या दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Web Title: Afratafri movie pranali ghogare mugdha karhade houn jau de song release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • Marathi Entertainment News
  • marathi movie
  • New Song

संबंधित बातम्या

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
1

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
2

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
3

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Chhaya Kadam Bhootam Bhayyam: छाया कदमांचा ‘भूतम भयम्’चा अनुभव; ‘जठाई’च्या व्यक्तिरेखेबाबत अभिनेत्रीने सांगितली मनातली गोष्ट
4

Chhaya Kadam Bhootam Bhayyam: छाया कदमांचा ‘भूतम भयम्’चा अनुभव; ‘जठाई’च्या व्यक्तिरेखेबाबत अभिनेत्रीने सांगितली मनातली गोष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.