Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hindustani Bhau : लाठीचार्जच्या मुद्द्यावरून हिंदुस्थानी भाऊने सरकारला केली विनंती! “विद्यार्थ्यांवर हात उचलू….”

दिल्लीतील CJPच्या आंदोलनानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असताना, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊ यानेही या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत पोस्ट शेअर करत त्याने सरकारला आवाहन केले की, आंदोलनात सहभागी झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांवर कोणतीही कठोर कारवाई करू नये.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 21, 2026 | 09:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • त्या संदर्भात सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.
  • 99% हे गरीब आणि गरजू विद्यार्थी होते.
  • अनेकांनी त्यांचे वेगवेगळी मतं मांडली आहेत.
सोशल मीडियावर Cockroach Janta Party च्या आंदोलनाचीच चर्चा सुरु आहे. अशामध्ये सोशल मीडिया स्टार विकास फाटक म्हणजेच सुप्रसिद्ध हिंदुस्तानी भाऊने त्याचे मत मांडले आहे. नेहमी तरुणांसाठी तत्पर असणारा हिंदुस्थानी भाऊ याविषयातदेखील सहभाग घेत आहे. त्याने त्याचे विचार मांडत सरकारला विनंती केली आहे. तसेच त्या संदर्भात सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.

आधी ‘अल्याड पल्याड’ मग ‘घबाडकुंड’; विदर्भाचा युवा दिग्दर्शक ठरतोय मराठी हॉररचा नवा चेहरा!

हिंदुस्थानी भाऊ सरकारला विनंती करत म्हणतो की, “दिल्लीत विद्यार्थ्यांचे जे आंदोलन सुरु आहे. त्यात 99% हे गरीब आणि गरजू विद्यार्थी होते, जे आपल्या शैक्षणिक हक्कांसाठी रस्त्यावर उतरले होते. त्यातील काही मोजकीच मंडळी दंगेखोर होती. पण त्यांची शिक्षा त्या विद्यार्थ्यांना देऊ नये. मी सरकारला विनंती करतो की या विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद होऊ नये.” या दरम्यान, हिंदुस्थानी भाऊ CJP च्या पुढाऱ्यांवरही आक्रमक झाल्याचा दिसला. त्याने नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

एकंदरीत, हिंदुस्थानी भाऊ CJP पक्षाविषयी खास खुश दिसला नाही परंतु या संपूर्ण प्रकरणात असणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही आच येऊ नये याची संपूर्ण खबरदारी सरकारने घ्यावी अशी विनंती हिंदुस्थानी भाऊने केली आहे. कमेंट्समध्ये भाऊंच्या चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांचे वेगवेगळी मतं मांडली आहेत.

Purva Kaushik : तरुणांचे आंदोलन पाहून अभिनेत्रीला अश्रू अनावर! ढसाढसा रडत म्हणाली “लोकशाही असलेल्या…”

या पोस्टखाली कॅप्शनमध्ये हिंदुस्थानी भाऊने “जे चुकीचे आहेत, त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे” असे नमूद केले आहे. तसेच त्याने पेपरफुटी प्रकरणातील प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा मिळावी अशी मागणी पोस्टमध्ये केली आहे. हिंदुस्तानी भाऊसहित अनेक कलाकारांनी त्यांचे मत सोशल मीडियावर मांडले आहेत. CJP Protest हा मुद्दा सध्या सोशल मीडियावर ट्रेंडवर आहे.

Web Title: Against the backdrop of the students protest hindustani bhau made a request to the government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • CJP
  • CJP Protest

संबंधित बातम्या

‘विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांची उपमा देताना सदाभाऊ खोत यांना लाज वाटायला हवी,’ विजय वडेट्टीवार यांचा घणाघात
1

‘विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांची उपमा देताना सदाभाऊ खोत यांना लाज वाटायला हवी,’ विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Saurabh Gokhale : अभिनेत्याने केली सरकारची पाठराखण? “मी हिंदुविरोधी गोष्टींना…” सौरभ गोखलेचे ‘ते’ विधान आले चर्चेत
2

Saurabh Gokhale : अभिनेत्याने केली सरकारची पाठराखण? “मी हिंदुविरोधी गोष्टींना…” सौरभ गोखलेचे ‘ते’ विधान आले चर्चेत

Purva Kaushik : तरुणांचे आंदोलन पाहून अभिनेत्रीला अश्रू अनावर! ढसाढसा रडत म्हणाली “लोकशाही असलेल्या…”
3

Purva Kaushik : तरुणांचे आंदोलन पाहून अभिनेत्रीला अश्रू अनावर! ढसाढसा रडत म्हणाली “लोकशाही असलेल्या…”

“जालियनवाला बागची आठवण झाली”; विद्यार्थी लाठीचार्जनंतर संसद परिसरात चंद्रशेखर आझाद यांचे धरणे आंदोलन
4

“जालियनवाला बागची आठवण झाली”; विद्यार्थी लाठीचार्जनंतर संसद परिसरात चंद्रशेखर आझाद यांचे धरणे आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.