Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alliance OTT Show: 240 देशांमध्ये रंगणार ‘अलायन्स’; कुणाल खेमू होस्ट करणार प्राइम व्हिडिओचा पहिला डेली रिअॅलिटी शो!

अभिनेता कुणाल खेमू पहिल्यांदाच रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसणार आहे. 16 स्पर्धक, 42 भाग आणि अनपेक्षित ट्विस्टने भरलेला अलायन्स 26 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 16, 2026 | 01:29 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

प्राइम व्हिडिओने आपल्या बहुप्रतीक्षित रिअॅलिटी सीरिज **‘अलायन्स’**च्या जागतिक प्रीमियरची घोषणा केली आहे. 26 जूनपासून सुरू होणारा हा शो प्राइम व्हिडिओचा पहिला डेली रिअॅलिटी शो ठरणार असून भारतासह जगभरातील 240 देश आणि प्रदेशांमध्ये स्ट्रीम केला जाणार आहे. एकूण 42 भागांचा हा शो सहा आठवडे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. विशेष म्हणजे, या शोचा नवा भाग दररोज दुपारी 12 वाजता प्रदर्शित केला जाईल.

बानिजय एशिया निर्मित आणि अभिनेता कुणाल खेमू होस्ट करत असलेल्या या शोमध्ये 16 स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्पर्धक सहयोगी म्हणून खेळात प्रवेश करतील, मात्र बदलती समीकरणे, विश्वासघात आणि रणनीतीपूर्ण डावपेच त्यांच्या प्रत्येक युतीची परीक्षा घेणार आहेत. अखेरीस सर्व आव्हाने पार करून केवळ एकच स्पर्धक अंतिम विजेता ठरणार आहे.

‘अलायन्स’ हे टाल्पा स्टुडिओजच्या जागतिक स्तरावर लोकप्रिय डच फॉरमॅटचे पहिले आंतरराष्ट्रीय रूपांतर आहे. जॉन डी मोल यांनी तयार केलेल्या या फॉरमॅटची भारतीय आवृत्ती बानिजय एशियाने साकारली आहे. हिंदी भाषेतील ही अनस्क्रिप्टेड रिअॅलिटी सीरिज प्राइम व्हिडिओच्या प्राइम डे स्पेशल लाइनअपचाही भाग असणार आहे.

या शोच्या निमित्ताने कुणाल खेमू पहिल्यांदाच एखाद्या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत. आपल्या विनोदी शैली, हजरजबाबीपणा आणि अभिनय कौशल्यासाठी ओळखला जाणारा कुणाल आता एका वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Sunita Ahuja On Govinda Hair : ‘नकली केस लावतो’, कॅमेऱ्यासमोर सुनीताने उडवली गोविंदाची खिल्ली? ट्रोलिंगनंतर म्हणाली…

प्राइम व्हिडिओ इंडियाचे ओरिजिनल्स प्रमुख आणि संचालक निखिल माधोक यांनी सांगितले की, “अलायन्स हा भारतासाठी या प्रकारातील पहिलाच फॉरमॅट आहे. यात रणनीती, बदलती नाती आणि सतत बदलणारा गेमप्ले पाहायला मिळेल. प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याची क्षमता या शोमध्ये आहे.”

तर बानिजय एशियाचे संस्थापक आणि ग्रुप सीईओ दीपक धर यांनी म्हटले की, “अलायन्सची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्याचा भव्य स्केल आणि स्पर्धकांसमोर उभ्या राहणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आव्हानांचा संगम. हा शो वेगवान, अनपेक्षित आणि अत्यंत रोमांचक आहे.”

दररोज नवे ट्विस्ट, नव्या युती, विश्वासघात आणि भरपूर ड्रामाने भरलेला ‘अलायन्स’ 26 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून रिअॅलिटी शोप्रेमींसाठी हा एक नवा आणि वेगळा अनुभव ठरणार आहे.

Farah Khan On Akshay Kumar : ‘याने माझे पैसे खाल्ले…’; फराह खानच्या विधानामुळे अक्षय कुमार पुन्हा चर्चेत, व्हिडिओ व्हायरल

Web Title: Alliance to premiere on june 26 with kunal kemmu prime videos first daily reality show announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Prime Video

संबंधित बातम्या

Netflix controversy: Netflix वर गंभीर आरोप! निकोलस केजचा चित्रपट चोरल्याचा दावा; निर्मात्याने ठोकला 1000 कोटींचा खटला
1

Netflix controversy: Netflix वर गंभीर आरोप! निकोलस केजचा चित्रपट चोरल्याचा दावा; निर्मात्याने ठोकला 1000 कोटींचा खटला

Patri Sarkar: स्वातंत्र्यलढ्याची धग रूपेरी पडद्यावर; ‘पत्री सरकार १९४२’चे पहिले पोस्टर प्रदर्शित
2

Patri Sarkar: स्वातंत्र्यलढ्याची धग रूपेरी पडद्यावर; ‘पत्री सरकार १९४२’चे पहिले पोस्टर प्रदर्शित

Ramayana Movie: भारतच नव्हे, पाकिस्तानातही ‘रामायण’ची क्रेझ; ट्रेलर पाहून पाकिस्तानी नेटकऱ्यांनी केलं तोंडभरून कौतुक
3

Ramayana Movie: भारतच नव्हे, पाकिस्तानातही ‘रामायण’ची क्रेझ; ट्रेलर पाहून पाकिस्तानी नेटकऱ्यांनी केलं तोंडभरून कौतुक

August OTT Release : ऑगस्टमध्ये OTT वर मनोरंजनाचा महाडोस! ‘वेलकम टू द जंगल’ ते ‘KBC 18’; पाहा संपूर्ण यादी
4

August OTT Release : ऑगस्टमध्ये OTT वर मनोरंजनाचा महाडोस! ‘वेलकम टू द जंगल’ ते ‘KBC 18’; पाहा संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.