(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Amitabh Bachchan Injury: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन नेहमीच त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट आणि अभिनयामुळे चर्चेत असतात. मात्र, यावेळी ते त्यांच्या प्रकृतीमुळे चर्चेत आले आहेत. ‘कौन बनेगा करोडपती 18’च्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांचा पाय घसरून ते खाली पडले. यामध्ये त्यांच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. मात्र, ही दुखापत गंभीर नसल्याचे त्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे.
‘कौन बनेगा करोडपती 18’च्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी प्रेक्षकांशी संवाद साधताना त्यांच्या दुखापतीबद्दल माहिती दिली. बिग बींना या अवस्थेत पाहून स्टुडिओमधील प्रेक्षकांनाही आश्चर्य वाटले. मात्र, अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी जास्त चिंता करू नये, असे सांगितले.
एपिसोडची सुरुवात करताना अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, ते सहसा आपला मोनोलॉग सादर करण्यासाठी स्टेजच्या मध्यभागी उभे राहतात. मात्र, यावेळी गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे त्यांना उभे राहणे शक्य झाले नाही.
ते म्हणाले, “मी सहसा माझा मोनोलॉग सादर करण्यासाठी स्टेजच्या मध्यभागी उभा राहतो, पण आज माझ्या गुडघ्याला दुखापत झाली.”
यानंतर त्यांनी दुखापत नेमकी कशी झाली, याबद्दलही सांगितले. अमिताभ बच्चन म्हणाले, “काल, शूटिंगदरम्यान माझा पाय घसरून मी पडलो आणि माझ्या गुडघ्याला दुखापत झाली.” हे सांगताना त्यांनी आपल्या डाव्या गुडघ्याकडेही Amitabh Bachchan Injury, Amitabh Bachchan Knee Injury, Amitabh Bachchan KBC 18, KBC 18, Amitabh Bachchan Health, Amitabh Bachchan Accident, अमिताभ बच्चन, अमिताभ बच्चन दुखापत, अमिताभ बच्चन गुडघ्याला दुखापत, कौन बनेगा करोडपती 18बोट दाखवले.
अमिताभ बच्चन यांच्या गुडघ्याला दुखापत झाल्याचे समजल्यानंतर स्टुडिओमधील प्रेक्षक काहीसे चिंतेत पडले. मात्र, बिग बींनी लगेचच त्यांना सांगितले केले. ही दुखापत गंभीर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्पर्धकांसोबत संवाद साधताना आणि त्यांचे सूत्रसंचालन करताना ते उभे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, सुरुवातीच्या मोनोलॉगच्या वेळी उभे राहण्यास त्रास होत असल्याने त्यांनी बसून संवाद साधण्याचा निर्णय घेतला.
गुडघ्याला दुखापत झाल्यानंतरही अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती 18’चे शूटिंग थांबवले नाही. त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत एपिसोड पुढे सुरू ठेवला. यावेळी प्रेक्षकांनीही अमिताभ बच्चन लवकर बरे व्हावेत, अशा शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चा झाली. त्यांनी अलीकडेच आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून मुलगा अभिषेक बच्चनसोबतच्या नात्याबद्दल, त्यांच्यातील मतभेद आणि परस्पर आदर याबाबत आपले विचार मांडले आहेत.
‘सेक्शन ८४’मध्ये दिसणार अमिताभ बच्चन
कामाच्या आघाडीवर अमिताभ बच्चन लवकरच ‘सेक्शन ८४’ या चित्रपटात दिसणार आहेत. त्यामुळे ‘KBC 18’च्या मंचासोबतच त्यांच्या आगामी प्रोजेक्टचीही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.






