Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amitabh Bachchan – Saif Ali Khan: अमिताभ बच्चन आणि सैफ अली खान यांच्यात आहे खास नातं; बिग बींनी स्वतः सांगितलं कनेक्शन

Amitabh Bachchan - Saif Ali Khan: मिताभ बच्चन यांनी सैफ अली खानसोबतच्या खास कौटुंबिक नात्याचा खुलासा केला. कपूर, बच्चन आणि सैफ कुटुंबातील हे खास कनेक्शन जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 03, 2026 | 01:39 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Amitabh Bachchan – Saif Ali Khan:‘कौन बनेगा करोडपती १८’च्या आगामी भागात अभिनेता सैफ अली खान आणि अक्षय कुमार त्यांच्या आगामी ‘हैवान’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमिताभ बच्चन यांच्या शोमध्ये हजेरी लावणार आहेत. या खास एपिसोडमध्ये गप्पा, मजामस्ती आणि चित्रपटाविषयी चर्चा रंगणार आहे. मात्र, यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी सैफ अली खानसोबत असलेल्या त्यांच्या खास कौटुंबिक नात्याचा खुलासा केला आहे. या नात्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असल्याचंही बिग बींनी सांगितलं.

‘बऱ्याच लोकांना माहित नाही की आपण नातेवाईक आहोत’

‘केबीसी १८’च्या आगामी भागाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन सैफ अली खानला म्हणताना दिसतात, “बऱ्याच लोकांना माहित नाही की आपण नातेवाईक आहोत.”

अमिताभ बच्चन यांचं हे बोलणं ऐकून सैफला आश्चर्याचा धक्का बसतो. तो लगेच, “मी?” असं विचारतो. त्यानंतर बिग बी सैफला त्यांच्या कुटुंबांमधील हे कनेक्शन समजावून सांगतात.

कपूर कुटुंबामुळे जोडले गेले बच्चन आणि सैफ

अमिताभ बच्चन सांगतात, “राज कपूर यांची मुलगी रितूचा मुलगा निखिल, याचं लग्न माझी मुलगी श्वेता हिच्याशी झालं आहे.”

श्वेता बच्चन यांचा विवाह राज कपूर यांची मुलगी रितू नंदा यांचा मुलगा निखिल नंदा यांच्याशी झाला आहे. त्यामुळे बच्चन आणि कपूर कुटुंबांमध्ये आधीपासूनच जवळचं कौटुंबिक नातं आहे.

राज कपूर हे अभिनेत्री करीना कपूर यांचे आजोबा आहेत. त्यामुळे निखिल नंदा आणि करीना कपूर हे चुलत भावंडे आहेत. दुसरीकडे, करीनाने सैफ अली खानसोबत लग्न केल्यामुळे हे कौटुंबिक कनेक्शन पुढे सैफपर्यंतही पोहोचतं. अशा प्रकारे सैफ आणि बच्चन कुटुंब एकमेकांशी नात्याने जोडले गेले आहेत.

‘मी करीनाला काय म्हणून हाक मारावी?’

हा खुलासा झाल्यानंतर अमिताभ बच्चन स्वतःच या मोठ्या कौटुंबिक नात्याच्या गुंतागुंतीवर मिश्कील प्रतिक्रिया देताना दिसतात. ते सैफला विचारतात, “तर आता मला जाणून घ्यायचं आहे की मी करीनाला काय म्हणून हाक मारावी? आणि करीना मला काय म्हणून हाक मारेल?”

बिग बींच्या या प्रश्नावर सेटवर हास्याचं वातावरण निर्माण होतं. अमिताभ बच्चन, सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांच्यातील हा हलकाफुलका संवाद प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

Asim Riaz vs Vishal Aditya Singh: ‘इंजेक्शनने फक्त बॉडी बनते..’; असीम रियाझला विशाल सिंगचं सडेतोड उत्तर, पोस्ट करत म्हणाला…

‘हैवान’च्या प्रमोशनसाठी सैफ-अक्षय ‘केबीसी’मध्ये

दरम्यान, सैफ अली खान आणि अक्षय कुमार लवकरच दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या ‘हैवान’ या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात सैयामी खेर, श्रिया पिळगावकर, बोमन इराणी, शारीब हाश्मी, जिशु सेनगुप्ता आणि राजपाल यादव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘हैवान’ हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सैफ आणि अक्षय ‘कौन बनेगा करोडपती १८’मध्ये पोहोचले असून, याच एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी सैफसोबतच्या त्यांच्या कौटुंबिक नात्याचा केलेला खुलासा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Tarini Upcoming Twist: तारिणी बनली दहशतवादी? “कितनी जाने लेनी है?” म्हणत दिला धक्कादायक इशारा; मालिकेत नवा ट्विस्ट

Web Title: Amitabh bachchan saif ali khan family connection kbc 18

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • amitabh bachchan
  • Entertainemnt News
  • Saif Ali Khan

संबंधित बातम्या

Tarini Upcoming Twist: तारिणी बनली दहशतवादी? “कितनी जाने लेनी है?” म्हणत दिला धक्कादायक इशारा; मालिकेत नवा ट्विस्ट
1

Tarini Upcoming Twist: तारिणी बनली दहशतवादी? “कितनी जाने लेनी है?” म्हणत दिला धक्कादायक इशारा; मालिकेत नवा ट्विस्ट

Asim Riaz vs Vishal Aditya Singh: ‘इंजेक्शनने फक्त बॉडी बनते..’; असीम रियाझला विशाल सिंगचं सडेतोड उत्तर, पोस्ट करत म्हणाला…
2

Asim Riaz vs Vishal Aditya Singh: ‘इंजेक्शनने फक्त बॉडी बनते..’; असीम रियाझला विशाल सिंगचं सडेतोड उत्तर, पोस्ट करत म्हणाला…

Hanuman Ansh: ‘हनुमान अंश’ची ग्लोबल झेप! भारतानंतर आता जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार सिनेमा
3

Hanuman Ansh: ‘हनुमान अंश’ची ग्लोबल झेप! भारतानंतर आता जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार सिनेमा

Kalpana Iyer: ‘रम्बा हो’ गर्लचा इंडस्ट्रीवर संताप; वयाच्या सत्तरीतही कल्पना अय्यर मागतायत काम, नक्की काय घडलं?
4

Kalpana Iyer: ‘रम्बा हो’ गर्लचा इंडस्ट्रीवर संताप; वयाच्या सत्तरीतही कल्पना अय्यर मागतायत काम, नक्की काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.