anuja devre

‘दार उघड बये’ (Dar Ughad Baye) मालिका सुरु होऊन दोनच दिवस झालेत पण मालिकेच्या शीर्षकगीताला आणि कलाकारांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ‘दार उघड बये’ या मालिकेमध्ये नाशिकच्या अनुजा देवरेने (Anuja Devre Interview) ‘वरी कोरड आभाळ’ हे गाणे गायलं आहे. मालिकेचे हे शीर्षकगीत हृदय पिळवटून टाकणारे आहे. हे गाणे सध्या प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या गाण्याच्या निमित्ताने अनुजाची ही खास मुलाखत.

    अनुजा देवरेने (Anuja Devre) झी मराठी वाहिनीवरील ‘दार उघड बये’ (Dar Ughad Baye) या मालिकेचे शीर्षकगीत गाऊन मराठी संगीत क्षेत्रात (Singer Anuja Devre Interview) दमदार पदार्पण केले आहे.

    अनुजाबद्दल सांगायचं झालं तर ती शिक्षण आणि गायन असा दुहेरी प्रवास करत आहे. अनुजा म्हणाली की तिच्या आईचा आणि आजीचा आवाज सुंदर आहे. तिथूनच तिला सर्व प्रेरणा मिळाली. रचना विद्यालयात शिकत असताना तिने इयत्ता दहावीपासून गाण्याच्या मंचावर भाग घेतला. उत्तम गाण्याबद्दल तिच्या शिक्षकांच्या कौतुकाने प्रेरित होऊन अनुजाने आंतरशालेय स्पर्धांमध्ये यश मिळवले. झी मराठीच्या मालिकेमध्ये गाण्याची तिची ही पहिलीच संधी आहे.

    ‘दार उघड बये’ मालिकेच्या शीर्षकगीत गायनासाठी निवड कशी झाली याविषयी अनुजा सांगते की, शीर्षक गीताचे संगीतकार विजय कापसे आणि माझी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात भेट झाली. आम्ही दोघांनी तिथे परफॉर्म केले. एके दिवशी त्याने मला एक प्रोजेक्ट आहे हे सांगण्यासाठी फोन केला. त्याने मला एक गाणं रेकॉर्ड करून पाठवायला सांगितले. नंतर मी रेकॉर्ड करून पाठवलेला गाणं हर्ष-विजय या दोन्ही संगीतकारांना आवडले आणि त्यानंतर मला गाण्याची संधी मिळाली.

    शीर्षकगीत गायनाच्या अनुभवाबद्दल अनुजा सांगते की, हर्ष- विजय यांनी मला गाण्यातला भाव समजावून सांगितला. गाण्याची पार्श्वभूमी सांगितली आणि पाय थिरकायला लावणारे शीर्षकगीत रेकॉर्ड झाले.

    पहिल्या गाण्याविषयी ती पुढे सांगते की, खरे सांगायचे झाले तर कधीही दबाव आणि भीती वाटली नाही. उलट या मालिकेचे शीर्षकगीत गाण्याची संधी मिळाल्याने मला खूप आनंद झाला. माझ्या गळ्यातील सुंदर गाणे गाऊन घेण्याचं श्रेय हर्ष-विजयला जाते.