Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anup Jalota Birthday : ७२व्या वाढदिवसानिमित्त अनुप जलोटांच्या घरी रंगली सुरांची मैफल; संगीत क्षेत्रातील दिग्गजांची खास उपस्थिती

Anup Jalota Birthday: 'भजन सम्राट' अनुप जलोटांनी ७२वा वाढदिवस मुंबईतील राहत्या घरी संगीतमय वातावरणात साजरा केला. हरीहरन, मिका सिंग, नितीन मुकेश, सुदेश भोसलेसह अनेक दिग्गज कलाकारांनी लावली उपस्थिती.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 29, 2026 | 03:15 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अनुप जलोटांच्या वाढदिवसाची खास मैफल
  • मिका सिंग, हरीहरन, नितीन मुकेशसह अनेक दिग्गज एकाच मंचावर
  • अनुप जलोटांचा ७२वा वाढदिवस अविस्मरणीय ठरला
 

Anup Jalota Birthday: ‘भजन सम्राट’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ गायक अनुप जलोटा यांनी त्यांचा ७२वा वाढदिवस ( Birthday)मुंबईतील राहत्या घरी अत्यंत खास आणि संगीतमय वातावरणात साजरा केला. या निमित्ताने संगीत आणि मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. गाणी, आठवणी आणि मैत्रीने सजलेला हा सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.

या खास वाढदिवस सोहळ्याला हरीहरन, मिका सिंग(mika singh), नितीन मुकेश, संजय टंडन, सुदेश भोसले, अगम कुमार निगम, रिचा शर्मा, शिवमणी, तलत अझीझ, बीना अझीझ, पेनाझ मसानी, रमेश सिप्पी, विंदू दारा सिंग, अंकित तिवारी, शादाब फरीदी, पृथ्वी गंधर्व यांच्यासह संगीत आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

संगीत क्षेत्रातील दिग्गजांची खास उपस्थिती

संपूर्ण संध्याकाळ संगीताच्या सुरांनी भारलेली होती. मिका सिंग आणि अनुप जलोटा यांनी एकत्र गझल आणि सदाबहार रेट्रो गाणी सादर करत उपस्थितांची मने जिंकली. तर सुदेश भोसले यांनी अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय गाण्यांसह आपल्या खास विनोदी शैलीने कार्यक्रमात रंगत आणली.

Mukkam Post Pandharpur: आषाढी एकादशीनिमित्त ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ची घोषणा; विठ्ठलभक्ती आणि आत्मशोधाचा भावस्पर्शी प्रवास

यावेळी नितीन मुकेश आणि संजय टंडन यांनी रेट्रो गाण्यांमधून उपस्थितांना जुन्या आठवणींमध्ये रमवले. तर रिचा शर्मा यांच्या दमदार आणि सुरेल गायकीने मैफिलीला वेगळीच उंची मिळाली. एकामागून एक कलाकारांनी सादर केलेल्या गीतांमुळे वाढदिवसाचा हा सोहळा एका संस्मरणीय संगीत मैफिलीत परिवर्तित झाला.

७२व्या वाढदिवसानिमित्त अनुप जलोटांच्या घरी रंगली सुरांची मैफल

जवळचे मित्र, सहकारी आणि संगीतप्रेमींच्या उपस्थितीत अनुप जलोटा यांनी वाढदिवसाचा प्रत्येक क्षण मनापासून अनुभवला. पहाटेपर्यंत रंगलेल्या या मैफिलीत कलाकारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला, संगीतावरील प्रेम व्यक्त केले आणि अनुप जलोटांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Rakhi Sawant On Kangana Ranaut: ‘कंगना रणौतचं तोंड घाणेरडं; पुन्हा चापट बसेल!’ राखी सावंतचा संताप, चारित्र्यावरही साधला निशाणा

संगीत, मैत्री आणि आपुलकीने भरलेली ही संध्याकाळ अनुप जलोटा यांच्या ७२व्या वाढदिवसाची कायम स्मरणात राहणारी आठवण ठरली.

 

Web Title: Anup jalota birthday celebration with music industry artists marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Birthday
  • Bollywood News
  • Famous Singer

संबंधित बातम्या

Sanjay Dutt Birthday: ‘रॉकी’पासून ‘धुरंधर’पर्यंतचा प्रवास; संजय दत्तच्या आयुष्यातील संघर्षांची कहाणी
1

Sanjay Dutt Birthday: ‘रॉकी’पासून ‘धुरंधर’पर्यंतचा प्रवास; संजय दत्तच्या आयुष्यातील संघर्षांची कहाणी

‘पतीला घाबरून गप्प राहिले…’, बादशाहच्या दुसऱ्या पत्नीची धक्कादायक पोस्ट, सोशल मीडियावर खळबळ
2

‘पतीला घाबरून गप्प राहिले…’, बादशाहच्या दुसऱ्या पत्नीची धक्कादायक पोस्ट, सोशल मीडियावर खळबळ

“मी नरेंद्र मोदींना गांभीर्याने घेत नाही”; नसीरुद्दीन शाह पुन्हा चर्चेत; पंतप्रधान मोदींबाबतच्या वक्तव्याने वेधलं लक्ष
3

“मी नरेंद्र मोदींना गांभीर्याने घेत नाही”; नसीरुद्दीन शाह पुन्हा चर्चेत; पंतप्रधान मोदींबाबतच्या वक्तव्याने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.