Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anurag Kashyap: २० वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत अनुराग कश्यपचं अफेअर; तिसऱ्या लग्नावरही केला मोठा खुलासा!

Anurag Kashyap: ५३ वर्षीय अनुराग कश्यप यांनी ३३ वर्षीय शुभ्रा शेट्टीसोबतच्या नात्यावर भाष्य केलं. वयातील २० वर्षांच्या अंतरामुळे आलेली अस्वस्थता आणि लग्नाबाबतही त्यांनी खुलासा केला.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 17, 2026 | 02:35 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Anurag Kashyap: दिग्दर्शक आणि निर्माते अनुराग कश्यप सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. ५३ वर्षीय अनुराग कश्यप आणि त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या शुभ्रा शेट्टी यांच्या नात्याची अनेकदा चर्चा होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुराग यांनी शुभ्रासोबतच्या नात्यावर, लग्नाच्या योजनांवर आणि वयातील अंतरामुळे येणाऱ्या अस्वस्थतेवर मोकळेपणाने भाष्य केलं.

“मी तिच्यासोबत खूप आनंदी आहे”

जेनिस सेक्वेरा यांच्याशी झालेल्या संवादात अनुराग कश्यप यांनी शुभ्रा शेट्टीसोबतच्या नात्याबद्दल बोलताना सांगितलं की, ते तिच्यासोबत आनंदी आहेत आणि त्यांना तिच्यासोबतच राहायचं आहे.

ते म्हणाले, “मी तिच्यासोबत खूप आनंदी आहे. मला तिच्यासोबतच राहायचं आहे. त्यामुळे, जे काही करावं लागेल ते मी करेन.”

अनुराग यांनी पुढे आयुष्याबद्दलच्या त्यांच्या विचारांवरही भाष्य केलं. “मला माझ्या प्रियजनांपेक्षा जास्त काळ जगण्याइतके निरोगी राहायचं आहे. कारण जर तसं झालं नाही, तर त्यानंतर काय होईल? त्यामुळे मी याचा खूप विचार करतो,” असं त्यांनी म्हटलं.

शुभ्रा लग्नावर विश्वास ठेवत नाही?

अनुराग यांच्या म्हणण्यानुसार, शुभ्रा शेट्टी लग्नाच्या संकल्पनेवर फारसा विश्वास ठेवत नाही. त्यामुळे सध्या दोघेही त्यांच्या नात्यात आनंदी असल्याचं त्यांनी सांगितलं.

“जोपर्यंत आपल्याकडे सध्या जे काही आहे, त्यात मी आनंदी आहे. मला ते गमवायचं नाही,” असं अनुराग यांनी स्पष्ट केलं.

Ananya Raj Death: कोण होती अनन्या राज? १५ जुलैला निधन; कुटुंबाने महिनाभर का लपवून ठेवली निधनाची बातमी? मृत्यूचं कारणही सांगितलं

वयातील २० वर्षांचं अंतर कधी बनलं होतं अस्वस्थतेचं कारण?

अनुराग आणि शुभ्रा यांच्या वयात तब्बल २० वर्षांचं अंतर आहे. या वयातील फरकामुळे एका टप्प्यावर अनुराग यांना अस्वस्थ वाटत होतं आणि त्यांनी शुभ्रापासून दूर राहण्याचाही प्रयत्न केला होता.

याबद्दल बोलताना ते म्हणाले, “असे काही क्षण आले जेव्हा आम्हाला थोडं अस्वस्थ वाटलं. मला जास्त अस्वस्थ वाटत होतं. एका क्षणी मला इतकं अस्वस्थ वाटलं की मी दूर राहण्याचा प्रयत्न केला.”

“ती तिच्या वयाची दिसत नाही”

शुभ्राच्या दिसण्याबद्दल बोलताना अनुराग यांनी सांगितलं की, तिच्या चेहऱ्यावरून तिचं वय कळत नाही. त्यामुळे जसजसं त्यांचं वय वाढत गेलं, तसतसं त्यांना या वयातील अंतराची जाणीव अधिक होऊ लागली.

ते म्हणाले, “तिच्या चेहऱ्यावरून तिचं वय कळत नाही. ती आजही तशीच दिसते. ती तिच्या वयाची दिसत नाही. त्यामुळे जसजसं माझं वय वाढत गेलं आणि ती तशीच दिसत राहिली, तसतसं मला थोडं अस्वस्थ वाटू लागलं.”

कशी सुरू झाली अनुराग-शुभ्राची लव्हस्टोरी?

शुभ्रा शेट्टी यांनी अनुराग कश्यप यांच्यासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. त्या अनुराग यांच्या निर्मिती संस्था फँटम फिल्म्सशीही संबंधित होत्या. दोघे २०१५ मध्ये पहिल्यांदा सार्वजनिकरित्या एकत्र दिसले होते, तर २०१८ मध्ये त्यांनी आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती.

सध्या शुभ्रा शेट्टी प्रसिद्धीपासून काहीशा दूर राहतात. मात्र, अनुराग यांच्यासोबतच्या नात्यामुळे त्या अनेकदा चर्चेत येतात.

अनुराग कश्यप यांचं यापूर्वी दोनदा लग्न

शुभ्रापूर्वी अनुराग कश्यप यांनी दोनदा लग्न केलं आहे. त्यांचं पहिलं लग्न आरती बजाज यांच्यासोबत झालं होतं. दोघांनी २००९ मध्ये घटस्फोट घेतला. या दोघांना एक मुलगी आहे.

यानंतर अनुराग यांनी अभिनेत्री कल्की कोचलिन यांच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र, त्यांचं नातंही फार काळ टिकलं नाही आणि २०१५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.आता शुभ्रा शेट्टीसोबतच्या नात्याबद्दल अनुराग यांनी केलेल्या या स्पष्ट वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा रंगली आहे.

Mugdha Godbole: मुग्धा गोडबोलेंच्या लेकीला पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो; लिहिली भावुक पोस्ट

Web Title: Anurag kashyap relationship actress 20 years younger third marriage revelation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • Anurag Kashyap
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
1

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
2

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
3

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
4

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.