( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
अन्वर इब्राहिम यांनी ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत’ हे लोकप्रिय गाणं पियानोच्या साथीने सादर केलं. हे गाणं १९६५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तीन देवियां’ या चित्रपटातील आहे. मजरूह सुलतानपुरी यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून, एस. डी. बर्मन यांनी त्याला संगीत दिलं आहे.
पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या गायनाला उपस्थितांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. राजनैतिक कार्यक्रमात भारतीय सिनेसंगीताची झलक पाहायला मिळाल्याने हा क्षण विशेष ठरला. अन्वर इब्राहिम यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या सादरीकरणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओसोबत त्यांनी मजेशीर कॅप्शन लिहित गाण्याची परवानगी मागितल्याचंही पाहायला मिळत आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी अन्वर इब्राहिम यांच्या गायनाचं कौतुक केलं आहे. “ते खूप छान गायले,” अशा प्रतिक्रिया अनेक युजर्सनी दिल्या. तर काहींनी अन्वर इब्राहिम इतकं सुंदर गाऊ शकतात, याची कल्पनाच नव्हती, असंही म्हटलं आहे.
भारतीय संगीताबद्दल अन्वर इब्राहिम यांनी प्रेम व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अनेक प्रसंगी भारतीय चित्रपट आणि गाण्यांचं कौतुक केलं आहे. त्यांच्या मागील भारत दौऱ्यात एका माध्यम संवादादरम्यान त्यांनी किशोर कुमार यांचं हेच गाणं गायल्याचंही सांगितलं जातं. याशिवाय दिल्लीतील एका कार्यक्रमात त्यांनी मुकेश यांचं ‘दोस्त दोस्त ना रहा’ हे प्रसिद्ध गाणंदेखील सादर केलं होतं.
View this post on Instagram
दरम्यान, अन्वर इब्राहिम यांच्या भारत दौऱ्यादरम्यान BRICSशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. मलेशिया यावेळी BRICSमध्ये भागीदार देश म्हणून सहभागी झाला आहे. शिखर परिषदेत जागतिक घडामोडींसोबतच आर्थिक संबंध आणि व्यापारविषयक मुद्द्यांवरही चर्चा झाली.
भारत आणि मलेशियामधील डिजिटल तंत्रज्ञान, पर्यटन यांसारख्या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावरही भर देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागतिक लोकप्रियतेचा उल्लेख करत अन्वर इब्राहिम यांनी त्यांच्या देशातील अनेक नागरिकांनी मोदींना शुभेच्छा देण्यास सांगितल्याचंही सांगितलं.
राजकीय आणि राजनैतिक चर्चांदरम्यान अन्वर इब्राहिम यांनी किशोर कुमारांचं गाणं सादर केल्याने भारत-मलेशिया संबंधांमध्ये सांस्कृतिक जवळीकही अधोरेखित झाली आहे.






