Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ayushmann Khurrana: सात चित्रपट, सात नवे दिग्दर्शक; आयुष्मान खुरानाची हटके काम करण्याची पद्धत चर्चेत

Ayushmann Khurrana: अभिनेता आयुष्मान खुरानाने नव्या दिग्दर्शकांसोबत सतत काम करण्यामागचं कारण सांगितलं. ‘उडता तीर’मध्ये तो वेगळ्या भूमिकेत दिसणार असून चित्रपट ९ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 01, 2026 | 02:45 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ayushmann Khurrana: अभिनेता आयुष्मान खुराना गेल्या दशकाहून अधिक काळ आपल्या हटके आणि पारंपरिक चौकटींना छेद देणाऱ्या भूमिकांसाठी ओळखला जातो. वेगळे विषय आणि दमदार व्यक्तिरेखा निवडण्यासोबतच आयुष्मानने नव्या आणि उदयोन्मुख दिग्दर्शकांना संधी देण्यावरही भर दिला आहे. आता ‘उडता तीर’च्या माध्यमातून तो पहिल्यांदा दिग्दर्शन करणाऱ्या किंवा हिंदी सिनेमात पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकांसोबतच्या सात चित्रपटांच्या प्रवासाला पूर्णत्व देणार आहे.

नव्या दिग्दर्शकांसोबत आयुष्मानची सातवी जोडी

आयुष्मानने आपल्या कारकिर्दीत अनेक नव्या दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. ‘दम लगा के हईशा’मध्ये शरत कटारिया, ‘शुभ मंगल सावधान’मध्ये आर. एस. प्रसन्ना, ‘ड्रीम गर्ल’मध्ये राज शांडिल्या, ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’मध्ये हितेश केवल्या, ‘डॉक्टर जी’मध्ये अनुभूती कश्यप, ‘एन अॅक्शन हिरो’मध्ये अनिरुद्ध अय्यर आणि आता ‘उडता तीर’मध्ये आकाश ए. कौशिक यांच्यासोबत त्याने काम केलं आहे.

या चित्रपटांना व्यावसायिकदृष्ट्या वेगवेगळे प्रतिसाद मिळाले असले, तरी आयुष्मानच्या निवडीमागचा एक समान दृष्टिकोन यामधून दिसून येतो. नवे विचार, हटके विषय आणि स्पष्ट क्रिएटिव्ह व्हिजन असलेल्या दिग्दर्शकांना तो सातत्याने पाठिंबा देताना दिसतो.

“माझ्यासाठी स्क्रिप्ट नेहमीच सर्वात आधी येते”

नव्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना आयुष्मान खुराना म्हणाला, “माझ्यासाठी स्क्रिप्ट नेहमीच सर्वात आधी येते. एखादा फिल्ममेकर त्याचा पहिला चित्रपट दिग्दर्शित करत आहे की दहावा, याकडे मी पाहत नाही. माझ्यासाठी महत्त्वाचं असतं ते म्हणजे त्याच्याकडे मला उत्साहित करणारी कथा आणि व्हिजन आहे का.”

तो पुढे म्हणाला, “माझ्या करिअरमधील काही सर्वात लक्षात राहिलेले अनुभव हे नव्या आवाजांसोबत काम करताना आले आहेत. ते आपल्या सोबत एक वेगळी भूक, फ्रेशनेस आणि ओळखीच्या विषयांकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याचं धाडस घेऊन येतात.”

एखाद्या कथेच्या मागे असलेला कन्विक्शन मजबूत असेल, तर त्या कथेचं पाठबळ करायला हवं, असा आपला विश्वास असल्याचंही आयुष्मानने सांगितलं.

Koffee With Karan: ‘वन लास्ट टाइम!’ २२ वर्षांनंतर ‘कॉफी विद करण’ला निरोप; शेवटच्या सीझनची घोषणा करताना करण जोहर भावुक

‘उडता तीर’मध्ये साकारणार वेगळी भूमिका

आयुष्मानचा आगामी चित्रपट ‘उडता तीर’ हा लेखक आकाश ए. कौशिक यांचा फीचर दिग्दर्शनातील पदार्पणाचा चित्रपट आहे. आकाश कौशिक यांनीच या देशभक्तीवर आधारित कॉमेडीचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.

या चित्रपटात आयुष्मान बिलाल अहमद नावाच्या पाकिस्तानी गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. मात्र, स्मृतीभ्रंश झाल्यानंतर तो स्वतःला भारतीय समजू लागतो. त्यामुळे स्पाय थ्रिलर आणि कॉमेडीचा वेगळा मिलाफ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

ट्रेलर लॉन्चवेळी आयुष्मानने या चित्रपटाचं वर्णन “पॅट्रियॉटिक कॉमेडी” असं केलं होतं. स्क्रिप्टची गरज जशी असेल, त्याप्रमाणे काम करणं पसंत असल्याचं सांगताना त्याने स्वतःला “डायरेक्टरचा बेबी” असंही म्हटलं होतं.

आकाश कौशिकच्या व्हिजनने आकर्षित झाला आयुष्मान

‘उडता तीर’मध्ये काम करण्याबद्दल आयुष्मान म्हणाला, “प्रत्येक नवा दिग्दर्शक सेटवर एक वेगळी एनर्जी घेऊन येतो. ‘उडता तीर’च्या बाबतीत मला केवळ त्याचा जॉनर आकर्षित करत नव्हता, तर आकाशने निर्माण केलेलं विश्वही मला आकर्षित करत होतं.”

तो पुढे म्हणाला की, एकाच वेळी अराजक, मजेदार, भावनिक आणि मोठ्या विचाराशी जोडलेली स्क्रिप्ट मिळणं ही दुर्मीळ गोष्ट आहे. त्यामुळे आकाशच्या व्हिजनसमोर स्वतःला पूर्णपणे समर्पित करून व्यक्तिरेखेला अनपेक्षित दिशेने घेऊन जाण्याची संधी त्याला महत्त्वाची वाटली.

हटके विषयांची निवड हीच आयुष्मानची ओळख

आयुष्मानच्या फिल्मोग्राफीकडे पाहिल्यास त्याने सातत्याने वेगळे आणि चर्चेला वाव देणारे विषय निवडल्याचं दिसतं. बॉडी इमेज, इरेक्टाइल डिस्फंक्शन, LGBTQ+ प्रेम, पारंपरिक चौकटीबाहेरील नातेसंबंध आणि सामान्य माणसावर येणारा सामाजिक दबाव अशा विविध विषयांना त्याने मनोरंजक पद्धतीने पडद्यावर मांडलं आहे.

त्यामुळे नव्या दिग्दर्शकांसोबत काम करणं हा आयुष्मानसाठी केवळ एक प्रयोग नसून त्याच्या क्रिएटिव्ह विचारसरणीचा भाग असल्याचं दिसतं.

Drishyam 3 Cast Fees: : अजय देवगणच्या मानधनाचा आकडा पाहून व्हाल थक्क! तब्बू आणि रजत कपूरची फी किती

९ ऑक्टोबरला ‘उडता तीर’ होणार रिलीज

‘उडता तीर’ हा चित्रपट ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आकाश ए. कौशिक यांच्या दिग्दर्शनातून आणि आयुष्मानच्या वेगळ्या भूमिकेतून हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे.

‘दम लगा के हईशा’पासून ‘उडता तीर’पर्यंतचा आयुष्मानचा हा सात चित्रपटांचा प्रवास केवळ नव्या दिग्दर्शकांसोबत केलेल्या कामाची यादी नसून, नव्या कथा आणि वेगळ्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवण्याच्या त्याच्या भूमिकेचं उदाहरण ठरतो.

Web Title: Ayushmann khurrana udta teer new directors script first

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Ayushmann Khurrana
  • Bollywood News
  • entertainment

संबंधित बातम्या

Drishyam 3 Cast Fees: अजय देवगणच्या मानधनाचा आकडा पाहून व्हाल थक्क! तब्बू आणि रजत कपूरची फी किती
1

Drishyam 3 Cast Fees: अजय देवगणच्या मानधनाचा आकडा पाहून व्हाल थक्क! तब्बू आणि रजत कपूरची फी किती

Afratafri Marathi Movie: ग्लॅमर, मस्ती आणि भन्नाट ठेका! ‘अफरातफरी’मधील ‘होऊन जाऊ दे’ गाणं रिलीज
2

Afratafri Marathi Movie: ग्लॅमर, मस्ती आणि भन्नाट ठेका! ‘अफरातफरी’मधील ‘होऊन जाऊ दे’ गाणं रिलीज

Koffee With Karan: ‘वन लास्ट टाइम!’ २२ वर्षांनंतर ‘कॉफी विद करण’ला निरोप; शेवटच्या सीझनची घोषणा करताना करण जोहर भावुक
3

Koffee With Karan: ‘वन लास्ट टाइम!’ २२ वर्षांनंतर ‘कॉफी विद करण’ला निरोप; शेवटच्या सीझनची घोषणा करताना करण जोहर भावुक

Amitabh Bachchan Injury: शूटिंगदरम्यान पाय घसरून पडले अमिताभ बच्चन; गुडघ्याला झाली दुखापत, सांगितली प्रकृतीची स्थिती
4

Amitabh Bachchan Injury: शूटिंगदरम्यान पाय घसरून पडले अमिताभ बच्चन; गुडघ्याला झाली दुखापत, सांगितली प्रकृतीची स्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.