Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अॅनिमेशनच्या जगात ‘बाहुबली: द इटरनल वॉर’चा डंका; एनेसी 2026 मध्ये होणार भव्य सादरीकरण

एस. एस. राजामौली यांचा 'बाहुबली: द इटरनल वॉर' हा अॅनिमेटेड प्रकल्प प्रतिष्ठित एनेसी इंटरनॅशनल अॅनिमेशन फिल्म फेस्टिव्हल 2026 मध्ये सादर होणार आहे. 'वर्क इन प्रोग्रेस' विभागासाठी निवड झाल्याने चित्रपटाची जागतिक स्तरावर चर्चा सुरू आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 18, 2026 | 03:46 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या ‘बाहुबली’ने आता अॅनिमेशन विश्वातही आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. ‘बाहुबली: द बिगिनिंग’ आणि ‘बाहुबली: द कन्क्लूजन’ या ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर आता ‘बाहुबली: द इटरनल वॉर’ हा महत्त्वाकांक्षी अॅनिमेटेड प्रकल्प जागतिक स्तरावर चर्चेत आला आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतरच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.

या उत्सुकतेला आता आणखी मोठं व्यासपीठ मिळालं आहे. दिग्दर्शक एस. एस. राजामौली ‘बाहुबली: द इटरनल वॉर’ हा प्रकल्प प्रतिष्ठित एनेसी इंटरनॅशनल अॅनिमेशन फिल्म फेस्टिव्हल 2026 मध्ये सादर करणार आहेत. विशेष म्हणजे, या महोत्सवाच्या ‘वर्क इन प्रोग्रेस’ विभागासाठी या चित्रपटाची निवड झाली आहे. अॅनिमेशन क्षेत्रात हा विभाग अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो आणि जगभरातील निवडक प्रकल्पांनाच येथे स्थान मिळते.

यापूर्वी ‘स्पायडर-मॅन: इन्टू द स्पायडर-वर्स’ तसेच ऑस्करविजेता ‘फ्लो’ यांसारखे चित्रपटही याच विभागात सादर करण्यात आले होते. त्यामुळे ‘बाहुबली: द इटरनल वॉर’ची निवड ही भारतीय अॅनिमेशन क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे.

या प्रकल्पाविषयी चाहत्यांमध्ये किती उत्सुकता आहे, याचा अंदाज फेस्टिव्हलमधील पॅनेल चर्चेच्या तिकिटांवरून येतो. बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत सर्व तिकिटे विकली गेली. त्यामुळे ‘बाहुबली’च्या नव्या अध्यायाबाबत जागतिक स्तरावर मोठी उत्सुकता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फ्रान्समधील एनेसी येथे दरवर्षी आयोजित होणारा हा महोत्सव अॅनिमेशन क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित कार्यक्रमांपैकी एक मानला जातो. पारंपरिक अॅनिमेशन, CGI, क्लेमेशन आणि विविध आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित चित्रपट येथे सादर केले जातात.

दरम्यान, ‘बाहुबली: द इटरनल वॉर’ हा दोन भागांत प्रदर्शित होणारा अॅनिमेटेड चित्रपट आहे. पुरस्कारविजेते दिग्दर्शक ईशान शुक्ला यांनी या प्रकल्पाचे दिग्दर्शन केले असून, चित्रपटाचा पहिला भाग 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता ‘बाहुबली’च्या या नव्या अॅनिमेटेड पर्वाकडे जगभरातील चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

सामंथा रुथ प्रभूने घेतली मुख्यमंत्री थलपथी विजय यांची भेट; नव्या मुख्यमंत्र्यांना पाहून अभिनेत्री भावुक, फोटो व्हायरल

Web Title: Baahubali the eternal war makes a grand mark in the animation world set for a prestigious showcase at annecy 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Psycho Ranga Trailer: गूढ ‘रंगा’ कोण? अन्यायाविरुद्ध पुकारली लढाई; ‘सायको रंगा’चा थरारक ट्रेलर रिलीज
1

Tumbbad Movie:‘तुम्बाड’च्या थीमवर साकारले गणपती मंडप; भयावह सजावटीने वेधलं लक्ष, चाहत्यांचा अनोखा अंदाज
2

Engineers Day: अभिनयासोबत शिक्षणातही अव्वल होते हे कलाकार; सुशांत सिंह राजपूतने शेवटच्या वर्षी का सोडली इंजिनिअरिंग?
3

Ambani Ganpati Celebration:: गणपती दर्शनासाठी बॉलिवूडकरांची मांदियाळी; अंबानींच्या उत्सवात ग्लॅमरचा तडका
4

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.