
(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)
Bigg Boss 20: सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 20’ सुरू होताच चर्चेत आला आहे. शोच्या पहिल्याच दिवसापासून स्पर्धकांमध्ये वाद आणि खटके उडताना पाहायला मिळत आहेत. आता मेकर्सने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये घरातील वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. शोमधील सर्वात कमी वयाची स्पर्धक अरिश्फा खान हिने भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे आणि टीव्ही अभिनेत्री माही विज यांच्याशी थेट पंगा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
नव्या प्रोमोमध्ये सर्व स्पर्धक लिव्हिंग एरियामध्ये बसलेले दिसतात. यावेळी अरिश्फा खान आम्रपाली दुबेकडे इशारा करत म्हणते की, “यांना वाटतं मी बच्ची आहे.” त्यानंतर ती पुढे म्हणते, “तुम्ही मला बच्ची समजता, पण तुमच्यापेक्षा माझं डोकं जास्त शार्प असेल.”
अरिश्फाच्या या वक्तव्यावर आम्रपाली दुबे तिला टोला लगावत म्हणते, “हां, कट रही है रील, कट रही है.” यावर अरिश्फाही शांत राहत नाही. ती म्हणते की, “मला रील कटवायची गरज नाही, माझी रील तशीच कटते.”
यानंतर वाद आणखी चिघळतो. अरिश्फा खान जोरात ओरडत ‘हिपोक्रेट लोक आहेत’ असं म्हणते. तिचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर माही विजही या वादात सहभागी होते. माही अरिश्फाला म्हणते की, “कोणी हिपोक्रेट नाहीये.”
त्यावर अरिश्फा स्पष्ट करते की, “मी तुम्हाला नाही बोलले.” मात्र, माही विज तिला उलट प्रश्न करत म्हणते, “तुम लोग क्या होता है?”
Tomorrow Episode Promo: It’s Choti Bachhi Arishfa Vs Amrapali & Mahhi #Bigg–#BBTak pic.twitter.com/YnnhZRJnPM — BBTak (@BiggBoss_Tak) September 7, 2026
या वादात आम्रपाली दुबेही पुन्हा सहभागी होते. ती अरिश्फाला घरच्या संस्कारांबद्दल बोलू नकोस, असा टोला लगावते. यावर अरिश्फा खान थेट आम्रपालीला उत्तर देत म्हणते की, “तुम्ही आधी शिव्या दिल्या आहेत.”
अरिश्फा, आम्रपाली आणि माही यांच्यातील हा वाद पाहून बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकही चांगलेच आश्चर्यचकित झाल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे.
दरम्यान, हा प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. २३ वर्षीय अरिश्फा खानने शोच्या पहिल्याच दिवसापासून आपली वेगळी छाप पाडल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. तिच्या आक्रमक अंदाजाचीही चर्चा होत आहे. दुसरीकडे, माही विजचा गेमही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस 20’मध्ये सध्या मेरी कोम, कनिका मान, माही विज, आम्रपाली दुबे, तन्मय सिंह उर्फ स्काउटओपी, ऋति तिवारी, ईशा रिखी, काजी तौकीर, आसिफ खान, कुशल तंवर उर्फ गुल्लू, लव गिल, अमन गांधी, उदिती सिंह, अरिश्फा खान, हर्ष माचरे उर्फ युंग डीएसए आणि रोहेद खान हे स्पर्धक सहभागी झाले आहेत.
आता पुढील भागात अरिश्फा आणि आम्रपाली-माही यांच्यातील हा वाद नेमका कोणत्या वळणावर जातो, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.